शब्दसमुहाबद्दल एक शब्द शालेय स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त shabda samuhabaddal ek shabd
१.जे माहित नाही ते – अज्ञात
२.अन्न देणारा – अन्नदाता
३.ज्याचा विसर पडणार नाही असा – अविस्मरणीय
४.पायात काहीही न घालणारा – अनवाणी
५.एखाद्याचे मागून येणे – अनुगमन
६.माहिती नसलेला – अज्ञानी
७.राखून काम करणारा – अंगचोर
८.शिल्लक राहिलेले – उर्वरित
९.वाटेल तसा पैसा खर्च करणे – उधळपट्टी
१०.दुसऱ्यावर जिवंत राहणारा – उपजीवी
११.सूर्योदयापूर्वीची वेळ – उषःकाल
१२.नदीची सुरुवात होते ते ठिकाण – उगम
१३.कविता करणारा – कवी
१४.कविता करणारी – कवयत्री
१५.कादंबरी लिहिणारा – कादंबरीकार
१६.सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष – कल्पवृक्ष
१७.दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा – कनवाळू
१८.कलेची आवड असणारा – कलाप्रेमी
१९.सतत कष्ट करणारा – कष्टाळू
20.कार्य करण्याची जागा – कर्मभूमी
२१.देवालयाचे शिखराचे टोक – कळस
२२.सहसा न घडणारे – क्वचित
२३.केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा – कृतज्ञ
२४.केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारा – कृतघ्न
२५.आकाशात गमन करणारा – खग
२६.नदीच्या दोन्ही बाजूंचा सुपीक प्रदेश – खोरे
२७.दोन डोंगरामधील चिंचोली वाट – खिंड
२८.एकाच वेळी अनेक जण बोलत असल्यामुळे होणारा आवाज – गलका
२९.भावनेच्या अतिरेकाने कंठ दाटून येणे – गहिवर
३०.देवळाच्या आतील भाग -गाभारा
३१.नेहमी घरात बसून राहणारा – घरकोंबडा
३२.ज्याच्या हातात चक्र आहे असा – चक्रधारी
३३.नक्षत्रासारखी सुंदर स्त्री – चटकचांदणी
३४.गावच्या कामकाजाची जागा – चावडी
३५.चार रस्ते एकत्र मिळालेले ठिकाण – चौक
३६.चित्रे काढणारा – चित्रकार
३७.जगाचा स्वामी – जगन्नाथ
३८.जेथे जन्म झाला आहे तो देश – जन्मभूमी
३९.पाण्यात राहणारे प्राणी – जलचर
४०.पाण्यामध्ये जन्मणारा प्राणी – जलज
४१.जाणून घेण्याची इच्छा – जिज्ञासा
४२.जीवाला जीव देणारा मित्र – जिवलग
४३.खूप जोरात किंवा एक सारख्या टाळ्या वाजवणे – टाळ्यांचा कडकडाट
४४.झाडांचा दाट समूह – झाडी
४५.सतत पडणारा पाऊस – झडी
४६.कधीही मृत्यू न येणारा – अमर
४७.मिळून मिसळून वागणारा – मनमिळावू
४८.गुप्त बातम्या काढणारा – गुप्तहेर
४९.आई-वडील नसणारा – अनाथ
५०.विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा – वस्तीग्रह
७२.सेवा करणारा – सेवक
७३.शंभर वर्षे आयुष्य जगणारा – शतायुषी
७४.स्वतःचे काम स्वतः करणारा – स्वावलंबी
७५.स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारा – स्वच्छंदी
७६.श्रम करून जीवन जगणारा – श्रमिक
७७.जमिनीचे दान – भूदान
७८.वाट दाखवणारा – वाटाड्या
७९.देशासाठी प्राण अर्पण करणारा – हुतात्मा
८०.क्षमा करणारी व्यक्ती – क्षमाशील
८१.दगडावर कोरीव काम करून मूर्ती बनवणारा – मूर्तिकार
८२.अस्वलाचा खेळ करणारा – दरवेशी
८३.गावच्या न्याय निवाड्याची जागा – चावडी
८४.ज्याची कशाशी तुलना करता येणार नाही असे – अतुलनीय
८५.वर्णन करता येणार नाही असे – अवर्णनीय
८६.किल्ल्याच्या भोवती बांधलेली भिंत – तट
८७.धान्य साठवण्याची जागा – कोठार
८८.कोणत्याही क्षेत्रात एकाकी घडून येणारा मोठा बदल – क्रांती
८९.कसलाही लोभ नसलेला – निर्लोभी
९०.पाणी मिळण्याची केलेली फुकट सोय – पाणपोई
९१.लोकांना आवडणारा – लोकप्रिय
९२.वर्षाने प्रसिद्ध होणारे – वार्षिक
९३.आपल्या देशात तयार झालेल्या वस्तू – स्वदेशी
९४.मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व – सूत्र
९५.क्षणात नष्ट होणारे – क्षणभंगुर
९६.केवळ स्वतःचा फायदा करून पाहणारा – स्वार्थी
९७.कैदी ठेवण्याची जागा – तुरुंग
९८.शरण आलेला – शरणागत
९९.लाज नाही असा -निर्लज्ज
१००.वाद्य वाजवणारा – वादक
१०१.वाडवलांनी मिळवलेली संपत्ती – वडीलोपार्जित
१०२.शोध लावणारा – संशोधक
१०३.ऐकायला येत नाही असा – बहिरा
१०४.ऐकायला व बोलायला येत नाही असा – मूकबधिर
१०५.कथा सांगणारा – कथेकार
१०६.कपडे शिवण्याचे काम करणारा – शिंपी
१०७.कपडे धुण्याचे काम करणारा – धोबी
१०८.खूप पाऊस पडणे – अतिवृष्टी
१०९.खूप आयुष्य असणारा – दीर्घायुषी
११०.गुरे राखणारा – गुराखी
१११.घरापुढे मोकळी जागा – अंगण
११२.घरे बांधणारा – गवंडी
११३.जादूचे खेळ करून दाखवणारा – जादूगर
११४.जिथे वस्तू विकल्या जातात ती जागा – दुकान
११५.जमिनीवर राहणारे प्राणी – भूचर
११६.लाकूड काम करणारा – सुतार
११७.अनेक फळांचा समूह – घोस
११८.झाडांची निगा राखणारा – माळी
११९.उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह – धबधबा
१२०.दररोज प्रसिद्ध होणारे – दैनिक
१२१.आठवड्याने प्रसिद्ध होणारे – साप्ताहिक
१२२.दारावरील पहारेकरी – द्वारपाल
१२३.दुसऱ्यावर उपकार करणारा – परोपकारी
१२४.देवा पुढे सतत जळणारा दिवा – नंदादीप
१२५.पायी चालणारा – पादचारी
१२६.बस गाड्या थांबण्याची जागा – बसस्थानक
१२७.भाषण करणारा – वक्ता
१२८.रणांगणावर आलेले मरण – वीरमरण
१२९.सोन्या चांदीचे दागिने करणारा – सोनार
१३०.हाताच्या बोटात घालायचा दागिना – अंगठी
१३१.अनेक केळ्यांचा समूह – घड
१३२.विमान चालवणारा – वैमानिक
१३३.शत्रूला सामील झालेला – फितूर
१३४.शेती करणारा – शेतकरी
१३५.माकडाचा खेळ करणारा – मदारी
१३६.लेखन करणारा – लेखक
१३७.चांगला विचार – सुविचार
१३८.दर तीन महिन्यातून प्रसिद्ध होणारे – त्रैमासिक
१३९.जंगलात लागलेली आग – बनवा
१४०.दोन नद्या एकत्र मिळण्याची जागा – संगम
१४१.सदा सुख देणारा – सुखदाता
१४२.पावसाचे पाणी पिऊन जगणारा पक्षीचा – चातक
१४३.कर्जाच्या खाली दबलेला – कर्जबाजारी
१४४.शंभर वर्ष आयुष्य जगणारा – शतायुषी
१४५.शेजाऱ्याशी वागण्याची पद्धत – शेजारधर्म
१४६.अग्नि विज्ल्यानंतर राहणारी पांढरी भुकटी – राख
१४७.अनेक चांगला गुणांनी युक्त असणारा – अष्टपैलू
१४८.स्वतःविषयीचे चरित्र – आत्मचरित्र
१४९.स्वतःची कोणतीही वस्तू सहज देणारा – उदार
१५०.आवरता येणार नाही असे – अनावर