२८ एप्रिल हा दिवस “सेवा हक्क दिन” म्हणून साजरा करण्याबाबत seva hakka divas celebration

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

२८ एप्रिल हा दिवस “सेवा हक्क दिन” म्हणून साजरा करण्याबाबत seva hakka divas celebration

संदर्भ : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५

प्रस्तावना :-राज्यातील नागरिकांना दिल्या जाणा-या सेवा पारदर्शक, गतीमान व कालबध्द पध्दतीने देण्याकरीता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ पारित करण्यात आला आहे. सदर अधिनियम हा दि. २८ एप्रिल, २०१५ रोजी अंमलात आला आहे. त्यानुषंगाने राज्यामध्ये २८ एप्रिल हा दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

राज्यात २८ एप्रिल हा दिवस “सेवा हक्क दिन” म्हणून साजरा करण्याबाबत या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

२. सदर दिवस साजरा करण्याबाबत कोणताही अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येणार नाही. सदर दिवस साजरा करण्यासाठी येणारा खर्च राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या तरतूदीमधून करण्यात यावा.

३. सेवा हक्क दिन साजरा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त

कार्यालयाने निर्गमित कराव्यात.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०४०११५३४५७८२०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार, नावाने.

DESHPANDE

Join Now