SET-EXAM राज्यस्तरीय पात्रता परीक्षा ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात अधिकृत वेबसाईट लिंक उपलब्ध set exam online application start
सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (पूर्वीचे पुणे विद्यापीठ) महाराष्ट्र शासन व गोवा शासन प्राधिकृत व यु.जी.सी., नवी दिल्ली मान्यताप्राप्त नोडल एजन्सी आयोजित
सेट परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित करीत असलेली चाळीसावी (४० वी) सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) रविवार, दि. १५ जून, २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहे. सदरहू परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगांव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी, नंदुरबार व पणजी (गोवा) या केंद्रांवर घेण्यात येईल. विद्यार्थ्यांनी अर्ज केवळ ऑनलाईन पध्दतीने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (https://setexam.unipune.ac.in) उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यातच भरावयाचा आहे. संकेतस्थळावर अर्ज दि. २४ फेब्रुवारी, २०२५ सकाळी ११.०० वाजल्यापासून दि. १३ मार्च, २०२५ सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत उपलब्ध असेल. ५०० रू. विलंब शुल्कासहीत अर्ज भरण्याचा कालावधी दि. १४ मार्च, २०२५ सकाळी ११.०० वाजल्यापासून दि. २१ मार्च, २०२५ सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत असेल.
विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील संपूर्ण अर्ज संगणकावर ऑनलाईन पध्दतीने अचूक भरावा. अर्जाची छापील प्रत स्वतःकडे जतन करून ठेवावी. तसेच सदरची प्रत कोणत्याही परीक्षा केंद्रावर अथवा सेट विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांचेकडे पाठवू नये.
परीक्षा शुल्क
१. खुला
रू. ८००/- (प्रक्रिया शुल्कासह)
२. इतर मागासवर्गीय/भटक्या व विमुक्त जाती जमाती /
रू. ६५०/- (प्रकिया शुल्कासह)
सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग (फक्त उन्नत व प्रगत गटात न मोडणाऱ्या उमेदवारांसाठी) (For Non-Creamy Layer)* / खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS)/आणि विकलांग प्रवर्ग (PWD) / अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/तृतीयपंथी / अनाथ
(टिप:- *उन्नत व प्रगत गटात न मोडणाऱ्या उमेदवारांसाठी वार्षिक उत्पन्नाच्या आर्थिक मयदिसंबंधी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा अलीकडील निर्णय संदर्भासाठी पहावा तसेच यासंदर्भात गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी गोवा शासनाने निर्गमित केलेले शासन निर्णय बंधनकारक असतील.)
विद्यार्थ्यांनी सेट परीक्षा फी फक्त केडीट/डेबीट कार्ड द्वारे किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे भरावी विद्यार्थ्यांनी अर्जाची छापील प्रत त्यांच्याकडे ठेवणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी सेट परीक्षेचे शुल्क क्रेडिट/डेबीट कार्ड / इंटरनेट बँकिंग द्वारे अदा करतील त्यांनी याबाबतचा पुरावा जतन करून ठेवावा.
सेट परीक्षेचे शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाच्या “https://setexam.unipune.ac.in” या संकेतस्थळावर साधारणतः एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवडयात प्रसिध्द करण्यात येईल. परीक्षा शुल्क भरून सुध्दा ज्या विद्यार्थ्यांचे नाव सदर यादीत समाविष्ट नसेल अशा विद्यार्थ्यांनी शुल्क अदा केल्याचा पुरावा set-support@pun.unipune.ac.in या ई-मेल आयडीवर पाठवावा.
सेट परीक्षेचे माहितीपत्रक व अभ्यासक्रम विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
“https://setexam.unipune.ac.in” या
टिपः- जर विद्यार्थी एखाद्या विषयात आधीच सेट परीक्षा उत्तीर्ण (पात्र) असेल तर त्याला परत त्याच विषयात सेट परीक्षा देता येणार नाही.