धबधबे,गड,किल्ले व स्मारके,पर्यटनस्थळे,धरणे इत्यादी ठिकाणी पर्यटकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक आदेश self protection pratibandhatmak adesh 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

धबधबे,गड,किल्ले व स्मारके,पर्यटनस्थळे,धरणे इत्यादी ठिकाणी पर्यटकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक आदेश self protection pratibandhatmak adesh 

पुणे ग्रामीण जिल्हयातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर, वेल्हा या तालुक्यातील ऐतीहासीक वास्त, गड, किल्ले व स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे इत्यादी ठिकाणी वपांविहार पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांना/ पर्यटकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक आदेश पारित होणेबाबत.

पुप्खोदेश

ज्याअर्थी, पोलीस अधीक्षक, पुणे जिल्यातील ग्रामीण भागामध्ये मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर, वेल्हा परिसरात मोठ्या प्रमाणावर पावसाळा सुरु असल्याने, बऱ्याच ठिकाणी धबधबे तयार झालेले आहे. सदर तालुक्यात असणाऱ्या भुशी, मुळशी, भाटघर, खडकवासला धरण परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक वर्षाविहार पर्यटनासाठी येत असतात. इतर दिवसांसह शनिवार, रविवार व सुटटीच्या दिवशी पर्यटनासाठी वरील भागात पर्यटक हे महाराष्ट्राच्या विविध ठिकाणाहुन तसेच प्रामुख्याने मुंबई शहर व पुणे शहर या ठिकाणाहून येतात. त्यामुळे या परिसरात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते व वाहतुक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो.

तसेच रात्रीच्या वेळी पर्यटन स्थळांची माहिती नसल्याने पर्यटक भरकटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पर्यटनासाठी येणाऱ्या नागरीकांची सुरक्षा अबाधित रहावी तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून उपाय योजना करण्यासाठी पुणे ग्रामीण भागामध्ये वर्षाविहार, पर्यटन करण्यास प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याची विनंती केली आहे.

तसेच धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणुन धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ होत असते. त्यामुळे अचानक पणे पाण्यात पर्यटक अडकल्याने व वाहुन गेल्याने मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या दृष्टीकोनातुन सदर यार्यावर प्रतिबंध घालणे अत्यंत आवश्यक आहे.

आणि ज्याअर्थी, पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण यांनी मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर, वेल्हा तालुक्यातील परिसरात पर्यटकांमुळे गर्दी होत असून त्यावर पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने निर्बंध घालण्याची बाब

निदर्शनास आणून दिलेले असून तशी माझी खात्री झालेली आहे. आणि त्याअर्थी, मी. डॉ. सुहास दिवसे, जिल्हादंडाधिकारी, तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन

प्राधिकरण, पुणे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १६३ अन्वये पुणे जिल्हयातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर, वेल्हा येथील प्रामुख्याच्या ठिकाणी पावसाळयातील पर्यटनासाठी येणाऱ्या नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता दि.०२/०७/२०२४ ते दि.३१/०७/२०२४ पर्यंत खालील ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश लागू करीत आहे.

१. मावळ तालुक्यातील भुशी डॅम, धरणे व गड किल्ले परिसर, वडगाव मावळ येथील बेंदेवाडी, डाहुली’ (आंदर मावळ) पाण्याचे धबधबे व लोणावळा शहर व ग्रामीण हददीतील धरण व गडकिल्ले परिसर टायगर पॉईट लॉयन्स पॉईट, राजमाची पॉईट खंडाळा, सहारा ब्रिज, पवना धरण, टाटा धरण, घुबड तलाब परिसर इ.

२. मुळशी तालुक्यातील मुळशी धरण व ताम्हीणी घाट जंगल परिसर व मिल्कीबार धबधबा.

३. हवेली तालुक्यातील खडकवासला धरण, वरसगाव धरण व सिंहगड, गडकिल्ले परिसर,

४. आंबेगाव तालुक्यातील भिमाशंकर, डिंभे धरण परिसर, कोंढवळ धचधवा

५. जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट तसेच धरणे व गडकिल्ले परिसर, शिवनेरी व माणिक डोह ६. भोर तालुक्यातील भाटघर धरणे व गडकिल्ले परिसर, पाण्याचे धबधबे

७. वेल्हा तालुक्यातील धरण व गडकिल्ले परिसर, कातळधरा धबधवा

८. खेड तालुक्यातील चासकमान धरण व भोरगिरी घाट, पाण्याचे धबधबे व जंगल परिसर

९. इंदापुर तालुक्यातील कुंभारगाव बोटींग क्षेत्र.

(सदरचे आदेश पोलीस, शासकीय सेवेतील अधिकारी कर्मचारी, डॉक्टर्स, अत्यावश्यक सेवेतील वाहने

यांना लागू राहणार नाहीत.)

दि.०२/०७/२०२४ ते दि.३१/०७/२०२४ पर्यंत खालील प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू करीत आहे.

1) पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तीना वरील नमूद ठिकाणी एकत्र येण्यावर प्रतिबंध राहील.

2) पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे,

3) धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे,

4) पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कटडे, धोकादायक वळणे इ. ठिकाणी सेल्फी काढण्यास व

कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे.

5) पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश 5

करणे, मद्य बाळगणे, मद्यवाहतुक करणे, अनाधिकृत मद्य विक्री करणे व उघडयावर मद्य सेवन करणे.

6) वाहतुकीचे रस्ते तसेच घोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे.

7) वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवणे, धोकादायक स्थितीत वाहन ओव्हरटेक करणे, 8) सार्वजनिक ठिकाणी खादयपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या, धरर्माकॉलचे व पनास्टिकचे

साहित्य उघडयावर व इतरत्र फेकणे,

9) सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगल टवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे.

10 ) ज्या कृतीमुळे ध्वनी, वायु व जल प्रदुषण होईल अशी कोणतीही कृती करणे.

11) सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, डिजे सिस्टम वाजविणे, त्यामुळे ध्वनीप्रदूषण करणे,

12) धबधब्याच्या 1 किलोमीटर परिसरात सर्व दुचाकी, तीनचाकी, चारचाकी व सहा चाकी वाहनांना प्रवेश करणेस मनाई करणेत

येत आहे. (अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून)

सदर आदेशाचे कोणतीही व्यक्ती / संस्था/ संघटना यांनी उल्लघंन केल्यास ते आपत्ती व्यवस्थापन अधिनियम

२००५ व भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम २२३ नुसार दंडनिय/ कायदेशीर कारवाईस पात्र राहतील. सदर आदेश माझ्या सही शिक्क्यानिशी दिनांक ०२/०७/२०२४ रोजी दिला आहे

शासन निर्णय pdf download 

Leave a Comment