इयत्ता 10 वी च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्रावर जन्म ठिकाणाची नोंद करणेबाबत Secondary School Examination Certificate
माध्यमिक शालांत परीक्षा (इ.१०वी) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शाळा सोडल्याचा दाखल्यावर (School Leaving Certificate) विद्यार्थ्यांची जन्मदिनांक व जन्मठिकाणाची नोंद असते. सदर दाखल्यावरील नमूद जन्मठिकाण विविध बाबीकरिता ग्राहय समजण्यात येत असते. विद्यार्थ्यांना अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, वाहन चालवण्याचा परवाना, पासपोर्ट इ. बाबी मिळवण्यासाठी जन्मदिनांक व जन्मठिकाणाची खातरजमा करण्यास्तव संबधित विद्यार्थ्यांकडून शाळा सोडल्याचा दाखल्याची मूळ प्रतीची मागणी संबधित यंत्रणेकडून करण्यात येते.
इ.११ वी मध्ये अथवा अन्य अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना विद्यार्थ्यांस मूळ शाळा सोडल्याचा
दाखला संबधित महाविद्यालयात / संस्थेत जमा करावा लागतो. सदर दाखला महाविद्यालय / संस्थेकडून विद्यार्थ्यांला परत मिळत नाही. त्यामुळे विविध स्पर्धा परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी, सरकारी / खाजगी आस्थापनेवरील सेवेत प्रवेश करतेवेळी तसेच शैक्षणिक कामकाजासाठी अनेक आवश्यक असणारी प्रमाणपत्रे / कागदपत्रे मिळवताना सदर दाखला विद्यार्थ्यांकडे उपलब्ध नसल्यास विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे अनेक विद्यार्थी दुय्यम शाळा सोडल्याचा दाखला मिळवण्यासाठी आपला मूळ शाळा सोडल्याचा दाखला हरवल्याची तक्रार करून त्याप्रमाणे शपथपत्र सादर करत असल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत. तसेच, शाळांना देखील शाळा
सोडल्याच्या दाखल्याची मूळ प्रत विद्यार्थ्यांस काही कालावधीसाठी देणे जिकीरीचे ठरते. राज्य मंडळातर्फे विद्यार्थ्यांस दिल्या जाणाऱ्या माध्यमिक शालांत परीक्षा (इ.१०वी) प्रमाणपत्रावर (Secondary School Examination Certificate) सद्यस्थितीत विद्यार्थ्यांचा जन्मदिनांक नमूद असतो. सदर प्रमाणपत्र कायमस्वरूपी विद्यार्थ्यांकडेच असते. सदर बाब विचारात घेवून प्रस्तुत प्रमाणपत्रावर विद्यार्थ्यांच्या जन्मदिनांकासोबत जन्मठिकाण नमूद करण्याची बाब
शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचे मार्फत फेब्रु / मार्च २०१७ पासून घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत परीक्षा (इ.१०वी) च्या प्रमाणपत्रावर (Secondary School Examination Certificate) विद्यार्थ्यांच्या जन्मदिनांकासोबत जन्मठिकाण (तालुका व जिल्ह्यासह) नमूद करण्याची कार्यवाही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी करावी.
शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण- २०१६/(प्र.क्र.९८/१६)/ एसडी-२
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१६१००५१५१४२५०१२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांन