Scolership exam पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी फेब्रुवारी 2024 च्या अधिसूचनेस प्रसिद्धी मिळणेबाबत
उपरोक्त विषयानुसार आपणास सविनय सादर करण्यात येते की पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग आठवी दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहेत सदर परीक्षेची अधिसूचना परिषदेच्यwww.mscpune.in व https://mscepuppss.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर अधिसूचना या पत्रासोबत जोडण्यात येत आहे कृपया सदर अधिसूचनेस राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रातून आकाशवाणीवरून व दूरध्वनी केंद्रावरून योग्य ती प्रसिद्धी विनामूल्य देण्यात यावी अशी विनंती आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेचे पीडीएफ येथे पहा👇
https://drive.google.com/file/d/1nPvN4LVbBMEnzjOFIZRYDlccahEMzS5-/view?usp=drivesdk
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा वर्ग पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग आठवी दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित करणे बाबतची अधिसूचना
शासनमान्य शाळांमधून सन 2023 व 24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ट होण्यासाठी तसेच इयत्ता आठवी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत प्रविष्ट होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेत प्रविष्ट होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन आवेदन पत्र परिषदेच्या संकेतस्थळावरील संकेतस्थळावर दिनांक एक सप्टेंबर 2023 रोजी पासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
उपरोक्त परीक्षा दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी घेण्यात येईल परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेची सविस्तर माहिती सोबतच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे प्रत्येक सूचना वाचूनच कार्यवाही करण्याची दक्षता सर्वांनी घ्यावी.
Scolership exam शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप
पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या दोन्ही प्रश्नपत्रिका येतील सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाचे असतील
प्रत्येक पेपर साठी ए बी सी डी संचाच्या प्रश्नपत्रिका देण्यात येतील
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग पाचवी साठी उत्तरांच्या चार पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असेल परंतु पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग आठवी साठीच्या प्रत्येक पेपरमध्ये कमाल 20% प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या चार पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील ते दोन्ही पर्याय नोंदणी बंधनकारक असेल.
Scolership exam शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता
विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा म्हणजेच पालकांचे महाराष्ट्रात किमान पंधरा वर्षे वास्तव्य असावे.
विद्यार्थी शासनमान्य शासकीय अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित स्वयंस अर्थसहाय्यता शाळेत वर्ग पाचवी किंवा वर्ग आठवी मध्ये शिकत असावा.
Scolership exam परीक्षेचे माध्यम
परीक्षा एकूण सात माध्यमांमध्ये घेतली जाईल
मराठी उर्दू हिंदी गुजराती इंग्रजी तेलगू आणि कन्नड इत्यादी भाषांमध्ये ही परीक्षा घेतली जाईल
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी साठी ऑनलाईन आवेदन पत्रात सेमी इंग्रजी हा पर्याय नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी पेपर एक मध्ये मधील गणित व विषयाची व पेपर दोन मधील बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची प्रश्नपत्रिका मूळ माध्यम व इंग्रजी माध्यम अशा दोन्ही माध्यमातून देण्यात येईल त्यामुळे ऑनलाईन आवेदन पत्रातील परीक्षेचे माध्यम निवडताना दक्षता घ्यावी.
Scolership exam वयोमर्यादा
या परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय दिनांक एक जून 2023 रोजी खाली दर्शविलेल्या तक्त्यातील वयापेक्षा जास्त नसावे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग पाचवी साठी अकरा वर्ष आणि दिव्यांगांसाठी पंधरा वर्षे
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा वयोमर्यादा वर्ग आठवी साठी सर्व प्रवर्गासाठी 14 वर्षे आणि दिव्यांगांसाठी अठरा वर्षे असेल
आवेदन पत्रात विद्यार्थ्यांची जन्मतारीख ही चुकीची नोंदविल्याने विद्यार्थी गुणवत्ताधारक असूनही केवळ सदर चुकीमुळे शिष्यवृत्ती पासून वंचित राहू शकतो त्यामुळे मुख्याध्यापकांनी स्वतः शाळेच्या जनरल रजिस्टर दाखल खारीक रजिस्टरवरून खात्री करून जन्मतारीख अचूकपणे नोंदणी आवश्यक आहे.
चुकीची जन्मतारीख नोंदवून विद्यार्थ्यांची आवेदन पत्रे भरल्यास संबंधित मुख्याध्यापकाविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.
अस्तित्वात नसलेली जन्मतारीख रजिस्टर मध्ये नोंद दिलेली असल्यास ती ऑनलाईन आवेदन पत्रात न नोंदवता योग्य त्या कार्य पद्धतीने नुसार दुरुस्त करून त्यानंतरच आवेदन पत्रात नोंदवावी.
Scolership exam PDF येथे पहा 👇
https://drive.google.com/file/d/1nPvN4LVbBMEnzjOFIZRYDlccahEMzS5-/view?usp=drivesdk
उपरोक्त तक्त्यात नमूद केलेल्या वयोमर्यादीपेक्षा जास्त वय असलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदन पत्रे भरल्या स्क्रीनवर विद्यार्थ्यांची व विहित कमाल वयोमर्यातीपेक्षा जास्त आहे तरीही विद्यार्थ्यास परीक्षेत प्रविष्ट होता येईल परंतु त्यास शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही असा संदेश असेल अशा विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेस प्रवेश मिळेल परंतु त्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादी स्थान मिळणार नाही याची नोंद घ्यावी तसेच सदर संबंधित विद्यार्थी व पालक यांच्याही निदर्शनास आणून द्यावी.