भारत सरकार शिष्यवृत्ती महाविद्यालय प्रवेश फी व तक्रारीबाबत scolarship fee and complaint
संदर्भ :-१. शासन निर्णय आविवि क्र शिष्यवृ-२०२१/प्र.क्र.९०/का.१२ दिनांक १७/०१/२०२२ २. अनुसुचित जमातीच्या विद्याव्यांच्या ऑनलाईन व महाविद्यालयाचे प्रवेशाबाबतचे
प्राप्त पत्र ३. या कार्यालयाचे जा.क्र.भासशि२०२४-२५ प्र.क्र. का. ३(४) ४०६३ दि.०२/०८/२०२ चे पत्र,
महोदय,
उपरोक्त संदर्भ क्रमांक १ अन्वये सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ महाडिबोटी पोर्टलवरुन अदा करण्यात येत असून सदर योजनेसाठी पात्र असलेल्या विद्याथ्यांना माहिती व तंत्रज्ञान विभागाने विकसीत केलेल्या महाडिबीटी पोर्टलवरुन त्यांच्या आधार लिंक बैंक खाते क्रमांकावर जमा करण्यात येते.
तथापी अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शैक्षणिक लाभ महाडिबीटी प्रणालीव्दारे अदायगीसाठी इतर शुल्काच्या १६ बाबी पुढीलप्रमाणे असून १. प्रवेश फी (अनुदानित विनाअनुदानित), २. प्रयोगशाळा शुल्क, ३. प्रर्धालय शुल्क, ४. जिमखाना शुल्क, ५. विविध गुणदर्शन उपक्रम शुल्क, ६. महाविद्यालय मासिक शुल्क, ७. संगणक प्रशिक्षण शुल्क, ८. नोंदणी शुल्क, ९. विद्यापीठ विकास निधी, १०. विद्यापीठ क्रिडा निधी, ११. विद्यापीठ अश्वमेध निधी, १२. विद्यापीठ वैद्यकीय मदत निधी, १३. विद्यापीठ विद्यार्थी सहाय्य निभी, १४. विद्यापीठ विद्यार्थी विमा निधी, १५. यूथ फेस्टिवल निधी, १६. विद्यार्थी ओळखपत्र याबाबीचे शुल्क शासनमार्फत महाविद्यालयांना अदा करण्यात येते.
संदर्भ क्रमांक १ मधील शासन निर्णयातील परिशिष्ट क्रमांक ६ मधील मुद्दा क्रमांक १२ अन्वये विद्यापिठ/ शैक्षणिक संस्था महाविद्यालय तंत्रनिकेतन यांनी संबधित अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची कोणतेही रक्कम आकारू नये. काही महाविद्यालय विद्यार्थ्यांकडुनशिष्यवृत्ती ऑनलाईन अर्ज भरताना नियम बाहय फी आकरत असून फी पावतीवर फी ०० (शुन्य) दर्शविण्यात येते. अशा तक्रारी विद्यार्थ्यांनकडून प्राप्त इ वाल्या असून त्याअनुषंगाने कोणत्याही अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांची पिळवणूक होणार नाही. याची योग्य तो दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित शैक्षणिक संस्थाची असेल विद्यार्थ्यांची पिळवणूक झाल्यास तसेच विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी आकारल्यास किंवा वसूल केल्यास संबधित शैक्षणिक संस्था महाविद्यालय यांच्या विरूद्ध फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात येईल असे उक्त शासन निर्णयात नमूद आहे.
संदर्भ क्र.२ अन्वये प्रवेशाच्या वेळी नवीन विद्यार्थ्यांना महाडीबीटी महाआयटी संगणक प्रणाली या आज्ञावलीबाबत माहिती दिली जात नसल्याबाबत विद्याथी व महाविद्यालय या कार्यालयास पत्रव्यवहार व ऑनलाईन तक्रारी प्राप्त होत आहेत. प्रवेशाच्या वेळी १७ जानेवारी २०२२ या शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांना मार्गदशक सुचना प्रथम दर्शनी भागात दर्शविण्यात याव्यात, जेणेकरुन विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी कागदपत्रे लवकरात लवकर उपलब्ध करुन देता येतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रकिया सुलभ होईल व विद्याथ्यांना शिष्यवृती लाभ वेळेत मिळू शकेल. विद्यार्थ्यांची प्रवेश प्रकिया पूर्ण करण्याची संपुर्ण जबाबदारी ही महाविद्यालयाची असुन सुदधा महाविद्यालय याबाबत गांभीयाने घेत नाही असे मुलांच्या तक्रारी नुसार दिसुन येत आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारी आपल्या पातळीवर सोडविण्यापेक्षा सदर विद्यार्थ्यांना कार्यालयास पाठविले जाते काही तक्रारीचे भ्रमणध्वनी व्दारे सुध्दा निराकरण होऊ शकते यामुळे विद्यार्थ्यांचे अर्थिक नुकसान व वेळ वाया जातो याबाबत सर्व महाविद्यालयांनी दक्षता घ्यावी.
या कार्यालयमार्फत अधिनस्त असलेल्या महाविद्यालयास संदर्भ क्र ३ अन्वये याबाबत निर्देश दिले असुनसुध्दा महाविद्यालयाकडून फी आकारण्यात येत असलेबाबतच्या विद्यार्थ्यांनकडुन तक्रारी या कार्यालयास प्राप्त झालेल्या आहेत. तरी उक्त संदर्भ क्रमांक १ अन्वये योग्य ती अमंलबजावणी करून अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांची फौ न आकारण्याबाबत तसेच मुलांची आर्थिक नुकसान होणार नाही याबाबत गाभीयाने दक्षता घेण्यात यावी. याबाबत तत्काळ कार्यावाही करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास तत्काळ अवगत
करण्यात यावा.