पावणेदोन लाख विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी ठरले पात्र प्राथमिक, माध्यमिकचा निकाल जाहीर scolarship exam result
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि. १८ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल जाहीर करण्यात आला आहे.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीसाठी राज्यभरातून ४ लाख ९२ हजार ३७३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १ लाख २२ हजार ६३० तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ३ लाख ६८ हजार ५४३ पैकी ५६ हजार १०९ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर शाळांना लॉगइनमधून विद्यार्थ्यांचा तसेच पालकांनाही पाल्यांचा निकाल पाहता येईल.
विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी शाळांच्या लॉगइनमधून दि. १० मेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येतील. प्रत्येक पेपरकरिता पन्नास रुपये शुल्क ऑनलाइन माध्यमातून
कोल्हापूर, पुणे विभाग आघाडीवर
■ पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती या दोन्ही परीक्षेत कोल्हापूर विभागात पात्र विद्यार्थ्यांची टक्केवारी सर्वाधिक आहे.
कोल्हापूर विभागात अनुक्रमे २४ हजार ६०१ (३२.६५ टक्के) आणि १० हजार ४६५ (२१.५४ टक्के) विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
■ पुणे विभागातील (पुणे, नगर आणि सोलापूर) अनुक्रमे ३२ हजार ३७१ (२८.९३ टक्के) आणि १३ हजार ९०४ (१७.७१ टक्के) एवढे विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
भरणे आवश्यक आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत निर्णय कळविण्यात येईल. गुण पडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती परीक्षा परिषदेच्या उपायुक्त अश्विनी भारूड यांनी दिली.