इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा अर्ज भरण्यास मदत वाढ scolarship exam application 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा अर्ज भरण्यास मदत वाढ scolarship exam application

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) फेब्रुवारी – 2025 च्या प्रसिध्दीपत्रकास प्रसिध्दी मिळणेबाबत…

महोदय,

उपरोक्त विषयानुसार आपणास सविनय सादर करण्यात येते की, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) दि. 09 फेब्रुवारी, 2025 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेची अधिसूचना दि. 17/10/2024 रोजी परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

सदर परीक्षेकरीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. १७ ऑक्टोबर ते ०७ डिसेंबर, २०२४ या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती. तथापि शाळांना शाळा नोंदणी व नियमिती शुल्कासह विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. १५ डिसेंबर, २०२४ पर्यंत व्दितीय व अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर प्रसिध्दीपत्रक या पत्रासोबत जोडण्यात येत आहे. कृपया सदर प्रसिध्दीपत्रकास राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रातून, आकाशवाणीवरून व दूरध्वनी केंद्रावरून योग्य ती प्रसिध्दी विनामूल्य देण्यात यावी अशी विनंती आहे. सोबत :- प्रसिध्दीपत्रक

कर्मचाऱ्यांचा तीन टक्के वाढीव महागाई भत्ता अदा करणे बाबत

कंत्राटी शिक्षक भरती स्थगित

वरिष्ठ वेतन व निवड श्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पद्धतीनेच

शैक्षणिक वर्ष 2025 मधील सार्वजनिक सुट्ट्या जाहीर

कंत्राटी शिक्षक भरती रद्द