ज्या प्राथमिक शाळांना सकाळी ९ पूर्वी शाळा भरवायची आहे अशा शाळांचे प्रस्ताव सादर करणेबाबत school timetable
पूर्व प्राथमिक ते इ. ४ थी पर्यंतचे वर्ग असलेल्या ज्या शाळांना सकाळी ९ पूर्वी शाळा भरवायची आहे अशा शाळांचे प्रस्ताव सादर करणेबाबत..
संदर्भ : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन परिपत्रक क्र संकीर्ण-२०२४/प्र.क्र.२७/एस.डी.-४ मंत्रालय, मुंबई दि.८ फेब्रुवारी २०२४.
संदर्भिय शासन परिपत्रकाचे अवलोकन व्हावे. उपरोक्त विषयान्वये, सकाळी ९ पूर्वी भरणाऱ्या सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पुर्व प्राथमिक ते इ. ४ थी पर्यंतचे वर्ग भरविण्याच्या वेळात बदल करणे यासाठी स्थानिक परिस्थितीचा विचार करुन सकाळी ९ किंवा ९ नंतर सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या पूर्व प्राथमिक ते इ. ४ थी पर्यंतचे वर्ग भरविण्याबाबत संदर्भिय शासन परिपत्रकान्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
परंतू ज्या पुर्व प्राथमिक ते इ. ४ थी पर्यंतचे वर्ग असलेल्या शाळांना सकाळी ९ पूर्वी शाळा भरवायची मागणी आहे अशा शाळांच्या शाळा व्यवस्थापन समिती सभेत ठराव मंजूर करुन तसा परिपूर्ण प्रस्ताव आपल्या कार्यालयाकडे मागवून घ्यावे.
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांनी आयोजित केलेल्या विविध शिक्षक संघटनांच्या बैठकीत दिलेल्या निर्देशान्वये सकाळ सत्रातील शाळांची वेळ बदलणेबाबत आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले आहे. तेव्हा तशी मागणी असलेल्या शाळांची यादी खालील नमुन्यात या कार्यालयास सादर करावी.