दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत शाळेच्या वेळेबाबत school timetable
संदर्भ :- 1.D.O. No. 17-30/2024-Coord, भारत सरकार शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडील पत्र दि. 06.08.2024.
2. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना दिनांक 06.08.2024 3. मा. सहसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांचे पत्र जा.क्र. मराशैकसंप्रप/कला क्रीडा/हरघर तिरंगा/2024/03764 दिनांक 06 ऑगस्ट 2024.
4. मा. विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या VC मधील सूचना दिनांक 09/08/2024.
5. मा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या चर्चेतील सूचना दिनांक
12.08.2024
उपरोक्त संदर्भीय पत्रानुसार स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत “हर घर तिरंगा” या उपक्रमाची सन 2024 मध्ये
दि. 09 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत शाळेत व परिसरात हर घर तिरंगा उपक्रामांतर्गत विविध कार्यक्रम
आयोजित करण्याच्या सूचना प्राप्त आहेत.
सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, अनुदानित अंशतः अनुदानित विना अनुदानित स्वयं अर्थ सहाय्यीत शाळांची वेळ दिनांक 13 व 14 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 ते दुपारी 12.30 पर्यंत राहील याची नोंद घ्यावी.
शाळांनी सकाळी ध्वजसंहिते प्रमाणे ध्वजारोहण करावे. दुपारच्या सत्रात भरणा-या शाळांनी विदयार्थ्यांच्या
अध्यापनाबाबत स्थानिक परिस्थितीनुसार वेळेचे नियोजन करावे. सर्वांनी ध्वज संहितेचे पालन करुन दिनांक 13 ते
15 ऑगस्ट या कालावधीत ध्वजारोहण करावे.
Jay Hind Jay Maharashtra