राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग सकाळी ०९ किंवा ०९ नंतर भरण्यांबाबत school time table 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग सकाळी ०९ किंवा ०९ नंतर भरण्यांबाबत school time table 

संदर्भ:

१. मा.उप सचिव, महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग शासन परिपत्रक क्रमांक संकिर्ण २०२४/प्र.क्र.२७/एस.डी. ४ दिनांक ०८ फेब्रुवारी २०२४

२. मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र क्र. प्रशिसं / ८०२/संकिर्ण/ १६४५/२४ दिनांक ०१/०३/२०२४. . जिपधा/आर/५७/२०२४ दि.०१/०४/२०२४

३. शिक्षणाधिकारी (प्रा.) जि.प. धाराशिव यांचे पत्र जा.क्र

उपरोक्त विषयी आपणास कळविण्यात येते की, विषयांचे संदर्भाधीन परिपत्रकातील मार्गदर्शक सुचनानुसार धाराशिव जिल्हयातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या (जि.प./खाजगी) सर्व शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता ०४ थी पर्यंतचे वर्ग सकाळी ०९ किवा ०९ नंतर भरवण्याबाबत योग्य ती कार्यवाही करुन अनुपालन या कार्यालयास सादर करावे असे संदर्भ क्र. ३ अन्वये कळविण्यात आलेले होते. तथापि शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये दिनांक १५/०६/२०२४ रोजी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम सर्व स्तरावर घेण्याचे आयोजित करण्यांत आलेले आहे. त्यामुळे दिनांक १५/०६/२०२४ रोजी दीर्घ सुट्टीच्या नंतर पहिला दिवस व शनिवार असल्याने खालील वेळापत्रकाप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना आपल्या अधिनस्त शाळांना आपल्या स्तरावरुन तात्काळ निर्गमित कराव्यात. तसेच शै. वर्ष २०२४-२५ मध्ये प्रत्येक शनिवारी अथवा अर्धवेळ शाळेच्या दिवशी या प्रमाणे शाळा भरवण्यात यावेत.

तसेच उपरोक्त नमुद केल्याप्रमाणे शाळेच्या वेळापत्रकाची तात्काळ अंमलबजावणी करुन केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल या कार्यालयास सादर करावा. तसेच सोमवार ते शुक्रवार यासाठी शासन परिपत्रक दिनांक ०८/०२/२०२४ नुसार सकाळी ०९ च्या नंतर नियमित वेळा पत्रकाप्रमाणे शाळा सुरु राहतील.

school time table 
school time table

Leave a Comment