शनिवार सकाळ सत्रातील शाळेच्या वेळेतील बदलाबाबत शाळा सकाळी 7:30 ते 11:00 यावेळेत भरवणेबाबत school saturday timetable
संदर्भ :- १)
महाराष्ट्र शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रिडा विभाग दि. ०८.०२.२०२५.
२) मा. शिक्षा संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे व्ही.सी.तील सुचना
३) जिल्हा परिषद, बुलढाणा समिती ठराव दिनांक १३-०२-२०२५.
४) विविध शिक्षक संघटना यांचे या कार्यालयास निवेदन.
वरील संदर्भिय विषयाचे अनुषंगाने, आपणास कळविण्यात येते की, संदर्भ क्रमांक १ नुसार सकाळी ९ पुर्वी भरणा-या राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना पुर्व प्राथमिक ते इयत्ता ४थी पर्यंतचे वर्ग सकाळी ९.०० किंवा ९.०० नंतर भरविण्याचे निर्देश प्राप्त आहेत.
तथापि, ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा शनिवारी सकाळी ९.०० ते १.०० या वेळेत भरविणे विदयार्थी व पालकांसाठी गैरसोयीचे असल्याने, सदरची वेळ पुर्वीप्रमाणेच ठेवण्यात यावी, अशी मागणी विविध शिक्षक संघटनांनी केली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद व खाजगी प्राथमिक शाळांची शनिवार रोजीची वेळ पुर्वीप्रमाणे सकाळी ७.३० ते ११.०० या वेळेत घेण्याबाबत निर्देश दिले आहेत.
तरी याव्दारे सूचीत करण्यात येते की, जिल्हयातील सर्व प्राथमिक शाळांची शनिवारच्या शाळेची वेळ ही सकाळी ७.३० ते ११.०० अशी करण्यात येत आहे. याबाबत आपल्या अधिनस्त सर्व शाळांना सूचीत करण्यात यावे. तसेच बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९ मधील शालेय वेळेच्या तरतुदीचा कुठेही भंग होणार नाही याची दक्षता घेण्याबाबतही सर्व संबंधितांना सूचीत करण्यात यावे.