प्राथमिक/माध्यामिक शाळेने कोणते रेकॉर्ड किती दिवस ठेवायचे त्याबाबत शासन निर्णय school records update
: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या कलम ३ मधील पोट-कलम (१) अन्वये लोकसेवा घोषित करणे बाबत.
संदर्भ :
१. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५
२. शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०१५ 4 / (44/34) / 7 कक्ष, दि.०४.०१.२०१६
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ या अधिनियमान्वये नागरिकांना दिल्या जाणान्या सेवा पारदर्शी पध्दतीने व मुदतीत देणे अधिक सुकर झाले आहे.
हा अधिनियम राज्यात लागू झाल्यानंतर प्रत्येक मंत्रालयीन विभागाने काही सेवा या अधिनियमांतर्गत अधिसूचित केल्या आहेत. परंतु केवळ तेवढ्याच सेवा देणे अपेक्षित नसून त्या व्यतिरिक्त नागरीकांच्या गरजेनुसार तसेच प्रशासकीय शिस्त येण्याच्या दृष्टीने अधिकाधिक सेवा अधिसूचित करणे अभिप्रेत आहे. याचाच एक भाग म्हणून सोबत जोडलेल्या तक्त्यातील सेवा दिनांक ०१ मे २०२२ पासून उक्त अधिनियमांतर्गत अधिसूचित करण्याचे प्रस्तावित आहे.
दिनांक ०१ मे २०२२ पासून सोबतच्या तक्त्यात दिलेल्या पध्दतीने सर्व सेवा प्रत्यक्ष संबंधितांना दिल्या जातील या दृष्टीने आपण आपल्या कार्यालयाच्या स्तरावर यापूर्वी दिलेल्या सूचनांप्रमाणे योग्य ती कार्यवाही पूर्ण करुन ठेवावी असे आपणास सूचित करण्यात येत आहे.