पहिली ते नववी विद्यार्थ्यांच्या अघोषित सुटीला लागणार ब्रेक school holidays
लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव : पहिली ते नववीच्या परीक्षा ऐन एप्रिलमध्ये रणरणत्या उन्हात होणार आहेत. ५ ते २५ एप्रिलदरम्यान परीक्षा होणार असून १ मे रोजी निकाल लावण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अघोषित सुटीला ब्रेक लागला आहे.
एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात परीक्षा संपून विद्यार्थी १ मेपर्यंत अघोषित सुटीवर जायचे. पण, यंदा ही सुटी मिळणार नसल्याचे स्पष्ट आहे. पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा एकाच वेळी घेण्याचे आदेश आहेत. त्यानुसार ५ ते २५ एप्रिल यादरम्यान सकाळी ८ ते ११ या वेळेत परीक्षा होणार आहेत. त्याचे वेळापत्रक मुख्याध्यापकांना पाठविण्यात आले आहे. शैक्षणिक वर्षाचा शेवटचा टप्पा सुरू असून, तोंडी परीक्षा सुरू झाली आहे. एप्रिलमध्ये ५ ते २५ एप्रिल दरम्यान सकाळी ८ ते ११ या वेळेत वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे.
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जून महिन्यात
पाचवी ते आठवीच्या • विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जतन करून ठेवाव्या लागणार आहेत. या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जूनमध्ये लगेच घेण्यात येणार आहे.
नव्या सत्रात शाळा सुरू 3 होण्यापूर्वी त्याचा निकालही जाहीर करावा लागेल. जेणेकरून त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देता येणार आहे. दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात वार्षिक परीक्षा घेतली जायची.
त्यामुळे विद्यार्थ्यांना एप्रिल 3 महिन्यात २० दिवस सुटी मिळायची. यावर्षी वार्षिक परीक्षा लांबल्याने विद्यार्थ्यांच्या अघोषित सुटी कमी झाली असून उन्हात विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहावे लागत आहे. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाबद्दल मात्र आता विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.