शाळा मान्यता/दर्जावाढ/नवीन वर्ग मान्यता साठी निकष व तपासणी सूची शासन निर्णय school grant new class joind
शाळा मान्यता / दर्जावाढ / नवीन वर्ग मान्यता/विविध बोर्डाच्या शाळांना ना-हरकत प्रमाणपत्र देणे/अनुदानाचा टप्पा निश्चित करणे / अतिरिक्त तुकडी मंजूर करणे / माध्यम बदल संदर्भातील तपासणी सूचीमध्ये सुधारणा करणेबाबत
प्रस्तावना –
शाळांना ना-हरकत प्रमाणपत्र देणे/अनुदानाचा टप्पा निश्चित करणे / अतिरिक्त तुकडी मंजूर शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबर त्यांची सुरक्षा ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. याकरीता शासनाने विविध उपाययोजना आखल्या आल्या आहेत. अलिकडील काळातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने घडलेल्या अनुचित घटनांच्या पार्श्वभूमीवर शासनाकडे विविध शैक्षणिक संस्थांकडून प्राप्त होण्या-या शाळा मान्यता / दर्जावाढ / नवीन वर्ग मान्यता/विविध बोर्डाच्या करणे / माध्यम बदल संदर्भातील तपासणी सूचीमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन परिपत्रक –
राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांनी शासनाकडे शाळा मान्यता दर्जावाढ नवीन वर्ग मान्यता/विविध बोर्डाच्या शाळांना ना हरकत प्रमाणपत्र देणे/अनुदानाचा टप्पा निश्चित करणे/ अतिरिक्त तुकडी मंजूर करणे / माध्यम बदल इत्यादी बाबत सादर करण्यात येणारे प्रस्ताव विहित तपासणी सूचीसह सोबतच्या जोडपत्र अ सह सादर करावेत. सदर” जोडपत्र-अ” सह विहित पद्धतीने प्राप्त होणा-या प्रस्तावांवरच संबंधित कार्यासनांनी यथोचित कार्यवाही करावी.
शासन परिपत्रक क्रमांकः तपासू २०२४/प्र.क्र. २२८/ एस. एम-५
२. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूक व्यवस्थेच्या अनुषंगाने जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीच्या बैठकांमध्ये खाजगी वाहनांद्वारे क्षमतेइतक्याच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याबाबत खबरदारी घेण्यात यावी.
३. ज्या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांची सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमार्फत वाहतूक व्यवस्था केली जाते त्या ठिकाणच्या वाहन चालक व वाहक यांच्यासाठी जाणीवजागृती करण्याचे कार्यक्रम परिवहन विभागाने राबवावे.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०९२४१६३६२३७९२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
तपासणी सूची खालील प्रमाणे
➡️CCTV
➡️शाळा व परिसरात CCTV बसविले आहे / नाही.
➡️तक्रारपेटी (ई बॉक्स)
➡️शाळेमध्ये तक्रारपेटी बसविण्यात आली आहे का? असल्यास, दर आठवड्याच्या शेवटी सदर पेटी संबंधित प्रतिनिधींच्या समक्ष उघडण्यात येते का?
➡️विद्यार्थी सुरक्षा
➡️विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे का?
➡️असल्यास समितीच्या नियमित बैठका झाल्या आहेत का?
➡️कंत्राटी तत्वावर नियुक्त कर्मचारी असल्यास त्यांची चारित्र्य पडताळणी करण्यात आली आहे का?
➡️पूर्व प्राथमिक, प्राथमिक वर्गातील सर्व विद्यार्थी व इयता ६ वी पासून पुढील वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनींकरीता स्वच्छता गृहामध्ये महिला मदतनीस नियुक्त केली आहे का?
➡️सखी सावित्री समितीच्या नियमित बैठका झाल्या आहेत का?
➡️शाळा स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने महिन्यातील एका शनिवारी प्रशिक्षण आयोजित केले जाते का?
➡️वाहतूक व्यवस्थेंतर्गत सुरक्षा
➡️शाळेमार्फ़त विद्यार्थ्यांची वाहतूक शाळेच्या वाहनाद्वारे होते काय?
➡️असल्यास, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनात GPS यंत्रणा आणि “पॅनिक बटन” उपलब्ध करून दिले आहे काय?
➡️शाळेमार्फत पुरविण्यात येणा-या खाजगी वाहनांमध्ये स्त्री मदतनीस नियुक्त आहे काय?
➡️शाळेच्या अधिकृत वाहतूक सेवेव्यतिरिक्त अन्य खाजगी वाहनांद्वारे विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्यास, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात
➡️पालकांकडून हमीपत्र घेण्यात आले आहे काय?
➡️शाळा प्रशासनाद्वारे गठीत परिवहन समितीच्या नियमित बैठका झाल्या आहेत का?
➡️RTE आधार वॅलिडेशन
➡️शाळेतील विद्यार्थ्याच्या आधार क्रमाकाची वर्गनिहाय यादी, आधार लिंकेज व वॅलिडेशन रिपोर्ट सोबत जोडला आहे काय?