१४ व्या वित्त आयोग निधीमधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळांकडील विद्युत देयके भरणेबाबत school electricity bill pay
उपरोक्त विषयास अनुसरून जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये डिजीटल स्कूल हि महत्वकांक्षी योजना सन २०१८-१९ पासून राबविणेत येत आहे. सदर योजने अंतर्गत शाळांना LED TV व Projector इ. सुविधा पुरविणेत आलेल्या आहेत. सदर उपक्रमांमध्ये शाळांमधील वीज कनेक्शन सुरळित कार्यान्वित असणे अनिवार्य आहे. तसेच सदर विज वापराची देयके शाळांना दिली जातात व शाळेच्या सादीलवारमधुन सदरचा खर्च केला जातो. तथापि सदर शाळांना मिळणारी सादीलवाराची रक्कम पहाता अत्यंत कमी प्रमाणात असुन त्यामधुन त्यांना स्टेशनरी करीता सुध्दा सदर रक्कम पूरेशी होत नाही. त्यामुळे विज देयकापोटी सदरची रक्कम वापरणे अडचणीचे झाले आहे.
वास्तव ग्रामपंचायतीना मिळणारा ग्राम निधी / १४ व्या वित्त आयोगातील रक्कमेतून शाळांची विज देयके भरणेची कार्यवाही करणेची आहे. त्यानुसार आपण सर्व ग्रामपंचायतींना तशा प्रकारच्या सक्त सुचना द्याव्यात. तालुक्यातील सर्व शाळांची विज देयके ग्राम निधी / १४ व्या वित्त आयोगातून भरणेधी कार्यवाही करणेत यावी. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल इकडे सादर करावा.