इ5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षा शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईनअर्ज भरणेकरीता दि.०७ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ scholarship exam online application date
शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ अधिसूचना जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/२०२४-२५/४५१२, दि. १७/१०/२०२४.
उपरोक्त संदर्भानुसार परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दिनांक ०९ फेब्रुवारी, २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेकरीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंचर, २०२४ या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती. तथापि शाळांना शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. ०७ डिसेंबर, २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर परीक्षेकरीता ज्या शाळांनो अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी दि. ०७ डिसेंबर, २०२४ अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी.