शब्दांच्या जाती – नाम शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नसंच scholership exam
कोणत्याही दृश्य-अदृश्य, सजीव-निर्जीव वस्तूच्या नावाला नाम म्हणतात.
• पुढील नामे वाचा व लक्षात ठेवा :
फुलांची नावे : गुलाब, मोगरा, चाफा, जाई, चमेली, कमळ इत्यादी.
● फळांची नावे : आंबा, चिकू, पेरू, अननस, कलिंगड, पपई इत्यादी.
पक्ष्यांची नावे : कावळा, चिमणी, पोपट, कबुतर, कोंबडा, मोर इत्यादी.
वन्य पशुंची नावे : वाघ, सिंह, गाढव, हत्ती, जिराफ, कोल्हा इत्यादी.
पाळीव पशुंची नावे : गाय, बैल, घोडा, बकरी, म्हैस, कुत्रा, मांजर इत्यादी.
नक्ष्यांची नावे : गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी, नर्मदा, सिंधू इत्यादी.
पर्वतांची नावे : हिमालय, सहयाद्री, सातपुडा, अरवली, विंध्य इत्यादी.
वस्तूंची नावे : पुस्तक, वही, पेन, घड्याळ, दिवा, टेबल इत्यादी.
मुलांची नावे : अजय, दीपक, विजय, संदीप, अमर, सुनील इत्यादी.
मुलींची नावे : सरिता, नलिनी, श्यामला, दीपाली, मेघना, लीना इत्यादी.
देशांची नावे : भारत, श्रीलंका, कॅनडा, चीन, अमेरिका, मलेशिया इत्यादी.
धान्यांची नावे : गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ, मका इत्यादी.
ग्रह, नक्षत्रे व ताऱ्यांची नावे : सूर्य, चंद्र, पृथ्वी, रोहिणी, मंगळ इत्यादी.
काल्पनिक नावे : अमृत, स्वर्ग, परी, परीस, राक्षस, देवदूत इत्यादी.
गुणांची नावे : सुंदरता, स्वच्छता, दयाळूपणा, शौर्य, नम्रता, औदार्य इत्यादी.
मनाच्या स्थितीची नावे : आनंद, कौतुक, दुःख, ममता, हास्य इत्यादी.
ऋतूंची नावे : वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर.
झाडांची नावे : आंबा, फणस, पेरू, जांभूळ, चिंच, शेवगा, खैर, साग, बाभूळ, उंबर इत्यादी.
कीटकांची नावे : डास, माशी, फुलपाखरू, नाकतोडा, मधमाशी इत्यादी.
राज्यांची नावे : महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान इत्यादी.
जिल्ह्यांची नावे : सातारा, सांगली, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, बीड, लातूर, धुळे, रत्नागिरी इत्यादी.
डाळींची नावे : मूगडाळ, तूरडाळ, मसूर डाळ, उडीद डाळ, चणाडाळ इत्यादी.
महिन्यांची नावे : आषाढ, चैत्र, वैशाख, श्रावण, डिसेंबर, मे, जून, ऑक्टोबर इत्यादी.