सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात स्काऊट व गाईड विषयास अनुरुप गणवेश वितरणाच्या कार्यवाहीबाबत scaut guide uniform 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात स्काऊट व गाईड विषयास अनुरुप गणवेश वितरणाच्या कार्यवाहीबाबत scaut guide uniform 

१. केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा अंतर्गत गणवेश योजनेचा लाभ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या इयत्ता १ ली ते ८ वी च्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनु. जाती मुले, अनु. जमाती मुले तसेच दारिद्रय रेषेखालील पालकांची मुले यांना प्रत्येकी दोन गणवेश संचाचा लाभ देण्यात येतो.

२. राज्य शासनाने निर्गमित केलेल्या दि.०८ जून, २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार सन २०२३-२४ पासून समग्र शिक्षा अंतर्गत गणवेश योजनेचा लाभ देण्यात न येणाऱ्या दारिद्रय रेषेवरील पालकांच्या मुलांना राज्य शासनाच्या योजनेमधून दोन शालेय गणवेश संचाचा लाभ देण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे.

३. सदर निर्णयानुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून एक नियमित गणवेश संच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून स्थानिक महिला बचत गटामार्फत शिलाई करुन पुरविण्यात येणार आहे.

४. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये स्काऊटस् व गाईडस् विषयास अनुरुप एक गणवेश संच संबंधित शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरुन शिलाई करुन पुरविण्यात येणार आहे. याकरीता गणवेश कापड पुरवठादार यांचेकडून शाळानिहाय लाभार्थी विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात कापड उपलब्ध करुन देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कापड पुरवठादाराकडून कापडाची निर्मिती झाल्यांनतर या कापडाच्या दर्जाची तपासणी टेक्सटाईल कमिटी मुंबई या केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग

मंत्रालयांतर्गत येणाऱ्या संस्थमार्फत करण्यात येणार असून कापडाच्या दर्जाच्या तपासणीअंती टेक्सटाईल कमिटीचे निरीक्षक यांच्या समक्ष त्या गणवेशाचे कापड सुयोग्य पॅकेटमध्ये भरून त्यावर टेक्सटाईल कमिटीचे सील लावण्यात येणार आहे.

५. स्काऊट व गाईड विषयास अनुरुप गणवशाचे कापड उपलब्ध करुन देण्यात आले नंतर सदर गणवेशाचे कापड सुस्थितीत असलेबाबत तसेच विदयार्थी संख्येच्या प्रमाणात उपलब्ध झालेची खात्री संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी करणे आवश्यक राहील.

६. इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्टील ग्रे रंगाचे हाफ शर्टचे कापड उपलब्ध करुन देण्यात येईल. शिलाई करताना (two patch pockets with sholder straps) देण्यात यावेत. तसेच इयत्ता १ ली ते ७ वीच्या विद्यार्थ्यांकरीता हाफ पॅन्टचे कापड उपलब्ध करुन देण्यात येईल. हाफ पॅन्टची शिलाई करताना (two side pockets and one back Pocket) देण्यात यावेत. इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी फुल पॅन्टसाठी गडद निळ्या रंगाचे कापडाचा पुरवठा करण्यात येईल. फुल पॅन्टची शिलाई करताना (two side pockets and one back Pocket) देण्यात यावेत.

७. पिनोफ्रॉक (One Piece) इयत्ता १ ते ५ वीच्या विद्यार्थीनींकरीता निळ्या रंगाचे (Deep Sky Blue) कापड उपलब्ध करुन देण्यात येईल. शिलाई करताना (two top patch pockets and two side pockets) देण्यात यावेत. कमीज इयत्ता ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थीनींकरीता आकाशी निळ्या रंगाचे (Deep Sky Blue) कापड उपलब्ध करुन देण्यात येईल. शिलाई करताना (two patch pockets and two side pockets) देण्यात यावेत. तसेच सलवार गडद निळ्या रंगाचे (Dark Blue) कापड पुरविण्यात येणार आहे.

८. सुलभ संदर्भासाठी स्काऊट गाईड गणवेशाचे फोटो संलग्न करण्यात येत आहेत.

९. विदयार्थी संख्येच्या प्रमाणात स्काऊट व गाईड विषयास अनुरुप गणवशाचे कापड पुरवठा न झाल्यास तसेच गणवेशाचे कापड खराब मळलेल्या स्थितीत आढळून

आल्यास स्वीकारण्यात येऊ नये. त्याबाबतची माहिती कापड पुरवठादारास त्वरीत देण्यात यावी. सदर बाब राज्य कार्यालयास अवगत करावी.

१०. स्काऊट व गाईड विषयास अनुरुप गणवेश शिलाईची रक्कम प्रती गणवेश संच रु.१००/- या दराने लाभार्थी विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात संबंधित शाळा व्यवस्थापन समित्यांना वितरीत करण्यात येणार आहे.

११. संबंधित शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरुन स्थानिक शिलाई कारागिर यांची निवड करावी व सदर कारागिरांच्या माध्यमातून स्काऊटस् व गाईडस् विषयास अनुरुप गणवेशाची शिलाई पूर्ण करण्यात यावी. शिलाई कारागिरांची निवड करतांना स्थानिक महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात यावे.

१२. वर नमूद केल्याप्रमाणे कापडाचे तागे BRC/CRC/लोक संचालित साधन केंद्रावर प्राप्त झाल्यानंतर सदर कापडाच्या गणवेशाचा स्वीकार करण्यासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे,

१ गट शिक्षणाधिकारी

अध्यक्ष

२ गट शिक्षणाधिकाऱ्यांनी सुचविलेल्या २ शाळांचे मुख्याध्यापक

सदस्य

१३. गणवेशाचे कापड प्राप्त झाल्यानंतर त्यावर टेक्सटाईल कमिटीचे सील आहे किंवा कसे, तसेच सर्व कापडाचे तागे सुस्थितीत आहेत, याची काळजीपूर्वक तपासणी करून त्यानंतरच सदरहू कापडाच्या ताग्यांचा स्वीकार करण्यात यावा. सुलभ संदर्भासाठी सिलचा नमुना सोबत जोडण्यात येत आहे.

१४. कापडाचा स्वीकार करतेवेळी वर नमूद केल्याप्रमाणे सील नसल्यास सदरहू मालाचा स्वीकार करण्यात येऊ नये व याबाबत योग्य नोंद घेऊन सदरचा माल पुरवठादारास अथवा त्याच्या प्रतिनिधीस परत करण्यात यावा.

१५. एखाद्या प्रसंगी, एखाद्या केंद्रावर कापडाचा पुरवठा सायंकाळी उशिरा प्राप्त झाल्यास सदरहू मालाचा पुरवठा स्विकारून सदरहू माल सुयोग्य ठिकाणी, योग्य पद्धतीने जमा करून घेण्याची जबाबदारी संबंधित गटशिक्षणाधिकारी यांची राहील. तथापि, अशा परिस्थितीत संबंधित गटशिक्षणाधिकारी यांनी कापड पुरवठादारास/त्यांच्या

प्रतिनिधीस कापडाच्या पुरवठ्याबाबत पोहोच देणे योग्य होणार नाही. कापड पुरवठादार/त्यांच्या प्रतिनिधीस सदरहू केंद्रावर दुसऱ्या दिवशी सकाळी नियोजित वेळेत उपस्थित राहण्याच्या सूचना गट शिक्षणाधिकारी यांचे स्तरावरून देण्यात याव्यात व या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कापडाचा पुरवठा झाल्याबाबत खात्री करून त्यानंतरच पुरवठ्याची पोच देण्यात यावी.

१६. पुरवठा झालेले गणवेशाचे कापड सुस्थितीत ठेवण्यासाठी पुरवठयाची जागा सुरक्षित असावी, गणवेशाचे कापड चोरीला जाणार नाही, अवेळी पडणाऱ्या पावसामुळे खराब होणार नाही अथवा उंदीर, घुशीपासून कुरतडले जाणार नाही, अशा जागेची निवड करावी.

१७. संबंधित गटाचे गट शिक्षणाधिकारी यांच्याकडून लाभार्थीच्या प्रमाणात इयत्तानिहाय व गणवेश प्रकारानुसार गणवेशाच्या कापड पुरवठ्याची खात्री झाल्यावर पुरवठादारास स्वाक्षरी देण्यात यावी. गट शिक्षणाधिकारी यांनी कापड पुरवठा संदर्भातील अहवाल शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना पुरवठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सादर करावा.

१८. शिलाई पूर्ण झालेले स्काऊट गाईड विषयास अनुरुप गणवेश संच, लाभार्थ्यांना वितरीत करण्यात यावेत. मुख्याध्यापकांनी त्या संदर्भातील लेखी स्वरुपातील अहवाल शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना सादर करण्यात यावा.

शासन निर्णय pdf download

Leave a Comment