दि.१६ ते २२ मार्च, २०२५ या कालावधीत जलजागृती सप्ताह साजरा करणेबाबत save water save life
संदर्भः शासन पत्र क्र. संकीर्णः-२०२५/प्र.क्र.९७/ एसडी-४ दि. १३.०३.२०२५
महोदय,
उपरोक्त संदभर्भीय शासन पत्राचे व सहपत्राचे कृपया अवलोकन व्हावे. (प्रत संलग्न)
संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय स्तरावर २२ मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या वतीने दि. १६ ते २२ मार्च, २०२५ दरम्यान “जलजागृती सप्ताह” साजरा केला जाणार आहे.
त्यानुषंगाने शासन पत्रातील संदभर्भीय जलसंपदा विभागाच्या दिनांक ११.०३.२०२५ रोजी च्या पत्रान्वये तसेच जलसंपदा विभागाच्या दिनांक ११.०२.२०१६ रोजी च्या शासन निर्णयामधील सूचनांनुसार सदर सप्ताह साजरा करावयाचा आहे. सप्ताह साजरा झाल्यानंतर याबाबतच्या कार्यवाहीबाबत त्या विभागास अवगत करावयाचे आहे.
तरी संदर्भाधीन पत्राच्या अनुषंगाने “जलजागृती सप्ताह” साजरा करण्याबाबत आवश्यक तो कार्यवाही करण्यात यावी व याबाबतचा अहवाल शासनास व या कार्यालयास सादर करावा, ही विनंती.