शनिवारी जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा पूर्वीप्रमाणे सकाळ सत्रात घेणे बाबत saturday school timetable
संदर्भ:-
१. शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई दि.०८/०२/२०२४.
२. जिल्हा परिषद अकोला शिक्षण समिती ठराव दिनांक २३/०८/२०२४.
३. जिल्हा परिषद अकोला सर्वसाधारण सभा ठराव दिनांक ३०/०८/२०२४.
४. या कार्यलयाचे पत्र क्र. ३०१०/२४. दिनांक २१/०६/२०२४.
५. या कार्यालयाचे पत्र जाक्र/जिपअ/प्रा-३/२७४१/२०२४-२५ दिनांक ३१/०५/२०२४.
उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरुन आपणास कळविण्यात येते की, संदर्भ क्र.१ च्या अनुषंगाने संदर्भ क्र.२ नुसार जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या प्राथमिक शाळा दर शनिवारी सकाळी ९ वाजे नंतर भरविण्याबाबत निर्देशीत करण्यात आले होते.
परंतु विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून जिल्हा परिषद अकोला शिक्षण समिती तसेच जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आलेल्या ठरावा नुसार या आदेशापासून जिल्हा परिषद अकोला अंतर्गत असलेल्या सर्व जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा दर शनिवारी तसेच संदर्भ क्रमांक ०५ मध्ये निश्चित केल्यानुसार शाळा पूर्वी प्रमाणे सकाळी ७ ते सकाळी ११.२०. वाजे पर्यंत घेणे बाबत संदर्भ क्र.१ मधील शासन निर्णयामधील मुद्दा क्रमांक ३ मधील अ.ब.व क. मध्ये
दिलेल्या निर्देशानुसार येणाऱ्या शनिवार पासून सकाळ सत्रातील शाळा पूर्वी प्रमाणे घेण्यासाठी आदेशीत करण्यात येत आहे.
करिता आपल्या स्तरावरून जिल्हा परिषद अकोला व्यवस्थापनाच्या शाळांना अवगत करून अहवाल या कार्यालयास
तत्काळ उलट टपाली सादर करावा.