प्रगणक,पर्यवेक्षकांचे मानधन बँक खात्यात जमा राज्य मागासवर्ग आयोगाकडे लेखी तक्रार sarvekshan mandhan
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मागासवर्ग आयोगानी प्रगणक व पर्यवेक्षकांच्या मदतीने राज्यभर सर्वेक्षण केले आहे. हा अहवाल राज्य शासनाला सादर केला आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही प्रगणक व पर्यवेक्षकांचे मानधन दिले जात नव्हते. त्यामुळे हे मानधन अदा करावे, यासाठी प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने राज्य मागासवर्ग आयोगाकडे निवेदनाद्वारे तक्रार केली होती. त्यांनतर प्रगणक व पर्यवेक्षकांच्या बँक खात्यावर मानधन
टाकण्यात आले.
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाद्वारे राज्यांत मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे २३ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना मानधन देण्याबाबतचे नियोजन आयोगाच्या ४ जानेवारी २०२४ च्या बैठकीत निश्चत झाले होते. प्रगणकांना मराठा एक कुटुंब
सर्वेक्षणास १०० रुपये व इतर कुटुंबास
सर्वेक्षणास १० रू. प्रशिक्षणाकरिता
प्रवास भत्ता ५०० रुपयेप्रमाणे मानधन
अदा करण्यात आले. प्रहार शिक्षक व
शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे राज्य
अध्यक्ष संतोष राजगुरू, अमोल तोंडे,
संजय हेरकर, संजय बागडी, वैशाली
भिसे आदींनी राज्य मागासवर्ग
आयोगाकडे तक्रार केली होती. हे
मानधन बँकेत जमा झाल्याने सर्वेक्षणचे
कार्य करणाऱ्या शिक्षकांनी समाधान
व्यक्त केले आहे. मराठा समाज सर्वेक्षण होऊन तीन महिने उलटले आहेत. तरीदेखील प्रगणक, पर्यवेक्षकांचे मानधन देण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांनी राज्य मागास आयोगाकडे तक्रार दिली.