प्रहार संघटनेच्या पाठपुराव्यास यश – मराठा समाज सर्वेक्षण : प्रगणक व पर्यवेक्षकाचे मानधन खात्यात जमा sarvekshan mandhan
जालनाः मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मागासवर्ग आयोग यांनी प्रगणक व पर्यवेक्षक यांच्या मदतीने राज्यभर सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाचा अहवाल राज्य शासनाला सादर झाला असून राज्य शासनाने हा अहवाल स्विकारला आहे. मात्र ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन देखील प्रगणक व पर्यवेक्षक यांचे मानधन अद्यापही दिले नसल्याने हे मानधन अदा करावे अशी मागणी प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने राज्य मागासवर्ग आयोगाकडे
निवेदनाद्वारे केली होती.
या मागणीनुसार सर्वेक्षणाच्या काम करणारे प्रगणक व पर्यवेक्षक यांच्या बॅक खाती मानधन अदा करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग व्दारे राज्यांमध्ये मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण २३ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीमध्ये करण्यात आले होते. या सर्वेक्षण कामकाजाकरिता नियुक्त अधिकारी / कर्मचारी यांना मानधन देण्याबाबतचे नियोजन आयोगाच्या ४ जानेवारी २०२४ च्या बैठकीत ठरले
होते. प्रगणकांना मराठा एक कुंटुब सर्वेक्षणास १००रु व इतर कुंटुंबास सर्वेक्षणास १० रू प्रशिक्षण करिता प्रवास भत्ता ५०० रुपये प्रमाणे मानधन अदा करण्यात आले आहे.
हे मानधन तातडीने अदा करावे असे मागणी प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष संतोष राजगुरू, अमोल तोंडे, संजय हेरकर, श्री संजय बागडी, वैशाली भिसे, इत्यादी पदाधिकाऱ्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाकडे केली होती. मानधन बँक खाती जमा झाल्याने सर्वेक्षण कार्य करणाऱ्या शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाने प्रहार संघटनेने सर्वेक्षण नियुक्त अधिकारी कर्मचारी यांचे मानधन अदा करण्याच्या मागणी प्रमाणे कार्यवाही केली आहे. प्रगणक व पर्यवेक्षक यांचे मानधन बँक खाती जमा झाले आहे. तर काही ठिकाणी मानधन जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे.
– संतोष राजगुरू, अध्यक्ष प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना, महा. राज्य.
आयोगाने प्रगणकांना चुकीची कुटुंबगणना दाखवून खरी मेहनतीची रक्कम देण्यासाठी application तंात्रीक अडचणीचे कारण पुढे करुन प्रगणकांना प्रत्यक्ष कामाच्या (कुटुंबसंखेच्या) पेक्षा कमी काहिंना तर फक्त २०% ते३०% एवढीच रक्कम दाखवली आहे हे चुकीचे आहे.
१५ ते २० दिवस काम करून ५००-७०० कुटुंबांची माहिती घरोघरी जाऊन भरणारांना तांत्रीक अडचणीचे कारण सांगून प्रवासासहीत ३००० रु देतात हे कोणतं गणीत आहे.
प्रत्येकजण आता उठसुठ अश्वासनांचा भडीमार करुन कामे करून घेतोय आणी बिचार्या कष्टकर्यांची पिळवणूक करतोय. यामध्ये प्रत्येकवेळी भरडले जातायत कर्मचारीच .