‘मराठा’ सर्वेक्षण करणारे प्रगणक मानधनाच्या प्रतिक्षेत:-३१ मार्चपूर्वी मानधन द्या sarvekshan mandhan 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

‘मराठा’ सर्वेक्षण करणारे प्रगणक मानधनाच्या प्रतिक्षेत:-३१ मार्चपूर्वी मानधन द्या sarvekshan mandhan

मराठा समाज आरक्षण संदर्भात दर्यापूर तालुक्यातील कर्मचाऱ्यांच्या वतीने २३ ते ३१ जानेवारी दरम्यान सव्र्व्हे करण्यात आला. संबंधित कर्मचाऱ्यांचे दोन महिने संपत आले, तरी अद्यापही मानधन मिळाले नसल्याने शेकडो कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. गरज सरो अन् वैद्य मरो अशी अवस्था झाल्याचाही सुर आहे.

राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याकरिता मागासवर्गीय आयोगामार्फत राज्यातील मराठा समाज व राखीव प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षक, नगरपालिका शिक्षक, तलाठी आदी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या. Maratha sarvekshan दर्यापूर शहर व ग्रामीण भागात तहसीलदार डॉ. रवींद्रकुमार कानडजे यांनी सर्वेक्षण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना आदेश दिले होते. त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांनी २३ ते ३१ जानेवारीपर्यंत तातडीने सर्वेक्षणाचे किचकट काम वेळेत पूर्ण करून प्रशासनाला अहवाल सादर केला. दरम्यान कर्मचाऱ्यांना लवकरच सर्वेक्षणाचे मानधन खात्यावर जमा करण्यात येणार असे सांगत कर्मचाऱ्यांचे बँक खाते इतर माहिती तहसील प्रशासनाने मागवून घेतली. परंतु, दोन महिने होत आले तरीही शेकडो सर्वेक्षण कर्मचाऱ्यांचे मानधन दिले नाही.

मानधन झाले नाही

• जिल्हा परिषद शिक्षकांनी तालुक्यातील सर्व ग्रामीण भागाचा मराठा-कुणबी व इतर मागासवर्गीय समाजाचे सर्वेक्षण विहित मुदतीत करून दिले. परंतु, अद्यापपर्यंत त्या सर्वेक्षणाचे मानधन शिक्षकांच्या बैंक खात्यावर जमा झाले नाही. ३१ मार्चपूर्वी तेजमा व्हावे, अशी अपेक्षा आहे. याबाबत social economic and backward class तहसील सोबत वारंवार संपर्क साधला असता, वरिष्ठांकडे माहिती पाठवल्याचे ते सांगत आहेत. – तुळशीदास धांडे, अध्यक्ष, राज्य प्राथमिक शिक्षक समिती, दर्यापूर

प्रगणकांच्या खात्यात निधी जमा करा

• मागासवर्गीय आयोगाच्या आदेशानुसार आम्ही महिला-पुरुष शिक्षकांनी शाळेच्या व्यतिरिक्त वेळ देऊन युद्ध पातळीवर सर्वेक्षणाचे काम शासनाला वेळेत करून दिले. परंतु, त्याचे मानधन आजपर्यंत कोणाच्याच खात्यावर जमा न झाल्याने शिक्षक-शिक्षिका वर्गात असंतोष आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्वेक्षण करणाऱ्या शेकडो प्रगणकांच्या खात्यावर निधी जमा करावा. – संगीता कोकाटे, शिक्षिका, जि. – प., दर्यापूर

अनुदान अद्याप प्राप्त झालेले नाही

• आरक्षण सर्वेक्षण करणारे प्रगणक आणि पर्यवेक्षक यांच्या अनुदानाची मागणी वरिष्ठ स्तरावर केलेली आहे. मात्र, अनुदान अद्याप प्राप्त झालेले नाही. Maratha reservation sarvekshan आमचा पाठपुरावा सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्चपूर्वी अनुदान प्राप्त झाल्यास तातडीने निधी वितरित केला जाईल. – डॉ. रवींद्रकुमार कानडजे, तहसीलदार, दर्यापूर,

सर्वेक्षणाचा गाजावाजा मात्र मानधन नाही

दर्यापूर तालुक्यात केलेल्या मराठा समाजाच्या आरक्षण सर्व्हेचा कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या मानधनाला मांजर आडवं गेलंय की माशी शिंकली, अशी चर्चा कर्मचाऱ्यांमधून होताना दिसून येत आहे. सर्वेक्षणासाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात गाजावाजा केला. कर्मचाऱ्यांकडून कामही करवून घेतले. मात्र आजपर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर मानधन जमा न झाल्याने चर्चेला पेव फुटले.

sarvekshan mandhan 
sarvekshan mandhan

Leave a Comment