सानुग्रह अनुदान योजना बंद केलेबाबत sanugrah grant
उपरोक्त विषयाबाबत वित्त विभागाचा संदर्भाधीन निर्णय कृपया पहावा.
२. वित्त विभागाच्या संदर्माधीन शासन निर्णयान्वये, परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत
सानुग्रह अनुदान pdf येथे पहा
👉👉pdf download
कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचान्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान मंजूर करण्याचा तसेच दि. २८/०९/२०१८ च्या शासन निर्णयान्वये लागू करण्यांत आलेली सानुग्रह अनुदान योजना दि. ३१/०३/२०२३ पासून बंद करण्यांचा निर्णय घेण्यांत आला आहे. त्याचप्रमाणे सानुग्रह अनुदानासाठी प्राप्त १७ झालेले अर्ज विचारात घेण्यांत येऊ नयेो व प्रलंबित प्रकरणे बंद करण्यांत यावीत असेही आदेश संदर्भाचीन शासन निर्णयाद्वारे देण्यांत आलेले आहेत.
3. सबब, सर्व जिल्हा परिषदांना कळविण्यांत येते की, यापुढे सानुग्रह अनुदानाचे प्रस्ताव शासनास सादर करण्यांत येऊ नयेत. तसेच शासनाकडे प्रलंबित असलेले प्रस्ताव संबंधित जिल्हा परिषदांना परत करण्यांत येतील.