संजय गांधी निराधार अनुदान योजना संपुर्ण माहिती sanjay gandhi niradhar yojna
पात्रता: १८ ते ६५ वषर्षापेक्षा कमी अपंग, विधवा, दुर्धर आजारामुळे ग्रस्त तृतीयपंथी, घटस्फोटीत महिला, परित्यक्ता महिला, अत्याचारीत महिला, वेश्या व्यवसायापासून मुक्त महिला, १८ वर्षाखालील अपंग/अनाथ मुले, ३५ वर्षाखालील अविवाहीत महिला, तुरुंगात शिक्षाभोगत असणारे कुटूंबप्रमुखाची पत्नी, देवदासी, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे कुटूंब.
➡️श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना संपुर्ण माहिती click here
आवश्यक कागदपत्रे
१) किमान १५ वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी,
२) वयाचा ६५ वषपिक्षा कमी असलेबाबतचा दाखला
३) कुटूंबाचे उत्पन्न प्रतिवर्ष रु. २१०००/- पर्यंत तहसिलदार यांचा दाखला. दिव्यांग
लाभार्थ्यांसाठी वार्षिक कुटूंब उत्पन्न प्रतिवर्ष रु. ५००००/-
पर्यंतचा तहसिलदार यांचा दाखला किंवा द्रारिद्रयेरेषेखालील कुटूंबाचे यादीमध्ये समावेश असलेबाबतचा साक्षांकित उतारा
४) तलाठी/ग्रामसेवक यांचा रहिवासी दाखला.
५)कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी निवासगृहात
आंतरवासी नसलेबाबतचा तहसिलदार किंवा तलाठी
ग्रामसेवक यांचे शिफारसीवरुन दिलेला दाखला.
६) सिव्हिल सर्जन यांचे ४०% दिव्यांग असलेबाबतचा प्रमाणपत्र. ७) अनाथ / परित्यक्ता असलेस तलाठी ग्रामसेवक यांचो संयुक्त
व बाल विकास अधिकारी यांचा दाखला व नगरपालिका क्षेत्रात कर निरीक्षक यांचा दाखला.
८) अविवाहीत महिलेस पुर्नविवाहाबाबतचे बंधपत्र.
९) शिधापत्रिका छायांकित प्रत.
१०) एच.आय.व्ही. व तृतीयपंथी प्रवर्गासाठी प्रकल्प अधिकारी
सक्षम वैद्यकिय अधिकारी / एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी
साक्षांकित केलेला दाखला.
11) स्वघोषणा.