जिल्हा परिषद, पंचायत समिती यांमध्ये कार्यरत असणाऱ्या संगणक परिचालकांचे थकित मानधन अदा करणेबाबत sangnak parichalak thakit mandhan
संदर्भ –
१. ग्रामविकास विभाग शासन परिपत्रक क्र. बामयं २०२०/प्र.क्र.३३/ वित्त-९, दि.२६/०८/२०२०.
२. शासनाचे समक्रमांकाचे दि.२१/०५/२०२१ चे पत्र.
३. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पंचायत समिती संगणक परिचालक कर्मचारी संघटना, ग्रामीण व शहरी यांचे दि. १२/०१/२०२५ रोजीचे पत्र.
विषयांकित प्रकरणी आपणांस कळविण्यात येते की, संदर्भ क्र.३ येथील दि.१२/०१/२०२५ रोजीच्या पत्रान्वये महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पंचायत समिती संगणक परिचालक कर्मचारी संघटना, ग्रामीण व शहरी यांनी त्यांचे मानधन माहे, ऑक्टोबर, २०२४ पासुन देण्यात आले नसल्याचे शासनास कळविले आहे.
२. संदर्भ क्र.२ येथील दि. २१/०५/२०२१ रोजीच्या शासन पत्रान्वये राष्ट्रीय ई-पंचायत कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये शासन परिपत्रक दि. २६/०८/२०२० नुसार
CSC e-governance India Itd. या कंपनीकडून संगणक परिचालकांच्या (Data Entry Operator) सेवा उपलब्ध करुन घेण्याचे कळविण्यात आले असून या करिता होणारा खर्च त्या त्या जिल्हा परिषदेने/पंचायत समितीने त्यांना १५ व्या वित्त आयोगाकडून प्राप्त होणाऱ्या अबंधित निधीपैकी १०% निधीतून करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तथापि, बहुतांश जिल्हा परिषदा/पंचायत समित्या यांनी संगणक परिचालकांचे मानधन माहे ऑक्टोबर, २०२४ पासुन अदा केले नसल्याचे निदर्शनास आले आहे.
३. या संदर्भात सर्व जिल्हा परिषद/पंचायत समिती यांना कळविण्यात येते की, त्यांच्या कार्यालयात नियुक्त केलेल्या संगणक परिचालकांचे मानधन नियमितपणे अदा करणे आवश्यक आहे. याकरिता, १५ व्या वित्त आयोगाकडून प्राप्त होणाऱ्या अबंधित निधीपैकी १०% निधीतून सदरचे मानधन अदा करणे शक्य होत नसल्यास जिल्हा परिषद व पंचायत समिती यांनी स्वनिधीतून सदरचे मानधन अदा करण्याची कार्यवाही करावी व थकीत मानधन तात्काळ अदा करावे.
यापुढे सदर संगणक परिचलकांचे मानधन नियमितपणे केले जाईल यांची कृपया दक्षता घ्यावी.