सन 2022-23 च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचे रिक्त पदावर समायोजन करणेबाबत sanchmanyata samayojan
संदर्भ:- १ संचमान्यता सन 2022-2023
२ प्रभुल्ल शहा, अधिक्षक (प्राथमिक), वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, पुणे -1 यांचेकडील जा.क्र. वेवभनिनिप/प्राथ/रि.प/सप्टें-23/2023-24/708 दि.3/10/2023 चे पत्र.
उपरोक्त संदर्भिय विषयास अनुसरुन सन 2022-23 संचमान्यता या कार्यालयाकडून वाटप करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार आपल्या संस्थेत / शाळेमध्ये अतिरिक्त होणा-या शिक्षकाचे प्रथम संस्थाअंतर्गत समायोजन करणेबाबत आपणास यापुर्वीच कळविणेत आलेले होते. संस्था अंतर्गत समायोजन करुण देखील आपलेकडे शिक्षक अतिरिक्त होत असल्यास अशा शिक्षकांची माहिती हे कार्यालय व वेतनपथक अधिक्षक यांचे मार्फत देखील मागविणेत आलेली होती. परंतु माहितीचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, काही संस्थानी / शाळानी अतिरिक्त पदाची माहिती अदयाप दिलेली नाही.
सोबतच्या यादीचे अवलोकन करुन अतिरिक्त शिक्षकांची माहिती दिलेली नसेल तर त्यांनी ती सोबतच्या प्रपत्र व मध्ये दि. 17/11/2023 पर्यंत या कार्यालयास संबंधित लिपिक यांचे निदर्शनास आणून कार्यालयीन टपाल शाखेकडे सादर करणेत यावी.
संचमान्यता व समायोजन परिपत्रक येथे पहा Click here
तसेच रिक्त जागाची माहिती देखील काही संस्था/शाळा अचुक देत नसलेचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे रिक्त पदाची माहिती प्रपत्र अ मध्ये बिंदुनामावलीसह या कार्यालयास सादर करावी.
अतिरिक्त व रिक्त पदाची माहिती या कार्यालयास वेळेत सादर न केलेस व आपल्या शाळेत अतिरिक्त शिक्षक राहिलेस त्यांचे वेतनाची सर्वस्वी जबाबदारी संस्था/शाळा यांची राहिल यांची नोंद घ्यावी. तसेच सदर शाळेने शिक्षक पद रिक्त असताना देखील रिक्त पदाची माहिती न कळविलेस अश्या संस्था/शाळा यांना रिक्त पद पवित्र
CS CamScar
पोर्टलमार्फत पदभरतीस परवानगी मिळणार नाही याची नोंद घ्यावी. त्यामुळे चुकीची अथवा अपुर्ण माहिती देणेत येऊ नये.
सोबत या कार्यालयात प्राप्त झालेल्या रिक्त पदाची व अतिरिक्त शिक्षकाची माहिती देणेत येत आहे त्यावर कोणाची हरकत असेल तर त्या हरकती देखील दि. 20/11/2023 रोजी अधिक्षक (रा.प) यांचे निदर्शनास आणून सबळ कागदपत्रासह लेखी टपाल शाखेकडे जमा करणेत यावी. त्यानंतर येणा-या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत यानंतर अंतिम अतिरिक्त शिक्षकाची व रिक्त पदाची यादी घोषीत करणेत येईल व त्यानुसार समायोजन प्रक्रिया घेणेत येईल याची नोंद घेणेत यावी.
मा.शि.अ. यांच्या मान्यतेने