जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रलंबित संचमान्यते विषयी करावयाच्या कार्यवाही बाबत sanchmanyata paripatrak
उपरोक्त विषयी सन २०२४-२५ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संचमान्यता आपल्या लॉगीनवर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. तथापि काही जिल्हा परिषद शाळेच्या संचमान्यता खालील कारणावरुन प्रलंबित आहेत. सदर प्रलंबित शाळेची यादी कारणासहित सोबत देण्यात येत असून भ्रमणध्वनीच्या ग्रुपवरही यादी देण्यात आली आहे. तरी, शाळेच्या नावासमोर दिलेल्या कारणाबाबत तात्काळ दिनांक १८.०३.२०२५ पुर्वी आवश्यक कार्यवाही करुन सदर शाळेच्या संचमान्यता उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी.
खालील कारणासाठी काय कार्यवाही करावी ते पाहूया
1.Data not available for S.M
सदर शाळेच्या कार्यरत पदाची व शाळेची माहिती अंतिम करावी.
2.Sanch Base Post Data Not available
सदर शाळेची मागील वर्षाची संचमान्यता असलेल्या प्रलंबित कारणाचा निपटारा करुन संचमान्यता सन २०२३-२४ करुन घ्यावी.
3.Student Data Not available
विद्याथ्यांची माहिती संचमान्यतेकरीता फॉरवर्ड करावी.
4.Student, School & Base Post Medium Mismatch
विद्याथ्यांचे, शाळेचे माध्यम एकच असल्याचे खात्री करावी. एकापेक्षा अधिक माध्यम लागू नसल्यास सदरचे माध्यम शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावरुन रिक्वेस्ट करुन शिक्षण उपसंचालक यांच्यास्तरावरुन मान्य करुन घ्यावेत. तसेच असे आढळून आले आहे की, सेमी इंग्रजी असताना शाळेचे माध्यम मराठी ऐवजी इंग्रजी करुन घेतले आहे. सेमी इंग्रजीची मान्यता असल्यास माध्यमात बदल होत नाही तरी अशा शाळांच्या बाबतीत माध्यम मागील वर्षाप्रमाणे ठेवावे.
२/- तसेच काही शाळांनी त्यांच्या वर्ग खोल्यांची माहिती शून्य नमूद करुन अंतिम केलेली आहे. त्यामुळे अशा शाळांना पदे मंजूर झालेले नाहीत. तरी अशा शाळांची यादी तयार करुन तात्काळ संचालनालयास सादर करावी, उपरोक्त निर्देशाप्रमाणे तातडीने कार्यवाही न झाल्यास आपणावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची नोंद घ्यावी.