संचमान्यता सन २०२४-२५ बाबत दिनांक 10 मार्च 2025 महत्त्वाचे परिपत्रक sanchmanyata paripatrak 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संचमान्यता सन २०२४-२५ बाबत दिनांक 10 मार्च 2025 महत्त्वाचे परिपत्रक sanchmanyata paripatrak 

संदर्भ :

१) शासन निर्णय क्र. एसएसएन-२०१५/प्र.क्र.१६/१५/टीएनटी-२, दि.१५.०३.२०२४

२) आपले पत्र क्र. प्रशिसं/संमादु/२५/टे-५००/९५९, दि.२४.०२.२०२५.

उपरोक्त विषयांकित प्रकरणी संदर्भाधीन क्र.१ शासन निर्णयानुसार सन २०२४-२५ च्या संचमान्यतेमध्ये इ.६ वी ते ८ वी गटाकरीता कोणतीही एक इयत्ता असल्यास १० पेक्षा कमी पट असल्यास व दोन किंवा तीन इयत्ता असल्यास २० पेक्षा कमी पट असलेल्या शाळेस पदवीधर शिक्षक अनुज्ञेय होत नसल्याने व पूर्वी मंजूर असलेली पदे अतिरिक्त ठरत असल्याने सदर गटास किमान १ पद मंजूर करण्याच्या अनुषंगाने संदर्भाधीन क्र.२ पत्रान्वये शासनास आदेशार्थ प्रस्ताव सादर केला आहे. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने आपणास खालीलप्रमाणे कळविण्यात येत आहे.

उपरोक्त संदर्भाधीन क्र.१ शासन निर्णयामध्ये १ ते २० पटांच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक (इयत्ता १ ते ४/५ व इयत्ता १ ते ७/८) शाळांसाठी किमान १ शिक्षक व तद्नंतर दुसऱ्या पदावर आवश्यकतेनुसार सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्याची तरतुद आहे. सदरहू तरतुदीच्या आधारे प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील इ. ६ वी ते ७/८ वी या गटात किंवा कोणत्याही इयत्तेत २० पेक्षा कमी पट असल्यास त्या गटासाठी किमान १ शिक्षक अनुज्ञेय करुन सन २०२४-२५ च्या संचमान्यता निर्गमित करण्यात याव्यात.

Join Now