संचमान्यता २०२४-२५ जनरेट झालेले आहे संचमान्यता पाण्यासाठी अधिकृत लिंक उपलब्ध sanchmanyata generete web link

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संचमान्यता २०२४-२५ जनरेट झालेले आहे संचमान्यता पाण्यासाठी अधिकृत लिंक उपलब्ध sanchmanyata generete web link 

उपरोक्त विषयी जिल्हा परिषद शाळेच्या सन २०२४-२०२५ च्या संचमान्यता शासन निर्णय दिनांक १५.०३.२०२४ व अनुषंगिक शासन निर्णयानुसार शिक्षणाधिकारी यांच्या लॉगीनला उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तरी सदर उपलब्ध झालेल्या संचमान्यता तातडीने तपासून शासन निर्णयानुसार पदे अनुज्ञेय झाले आहेत किंवा कसे याबाबत खात्री करावी. संच मान्यतेमध्ये त्रुटी असल्यास संचालनालयास दिनांक २५.०२.२०२५ पुर्वी अवगत करावे. त्यानंतर आलेल्या त्रुटी विचारात घेतल्या जाणार नाहीत याची नोंद घेण्यात यावी.

तसेच ज्या शाळेने दिनांक ३०.०९.२०२४ रोजी विद्यार्थी ऑनलाईन प्रणाली मध्ये नोंदविले नाहीत व ज्या शाळेमधील एकही विद्यार्थी आधार प्रमाणित केला नाही अशा शाळांची यादी संचालनालयास उपलब्ध करुन देण्यात यावी. त्याच प्रमाणे सद्यस्थितीत ज्या शाळांचे विद्यार्थी संचमान्यतेकरीता केंद्र प्रमुख/गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून ऑनलाईन फॉरवर्ड केले आहेत व ज्या शाळांनी वकींग पोस्ट भरली आहे अशा शाळांच्या संचमान्यता झाल्या आहेत. तरी उर्वरित शाळांच्या ऑनलाईन विद्यार्थी फॉरवर्ड करावे व कार्यरत पदांची माहिती शाळास्तरावरुन अंतिम करावी.

➖➖➖➖◼️➖➖➖➖

💥 *शाळांच्या संचमान्यता 2024 -25 च्या सुधारित निकषानुसार शाळा लॉगिन ला उपलब्ध*

💥 *वर्ग 6 ते 8 वरील हजारो शिक्षक अतिरिक्त*

💥 *ग्रामीण भागातील जिल्हा परिषद व खाजगी शाळांचे भविष्यात 6 ते 8 चे वर्ग बंद पडण्याची शक्यता*

🌈 *संचमान्यता 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार ज्या उच्च प्राथमिक शाळेत वर्ग 6 ते 8 हे तीनही वर्ग असतील तर तीन शिक्षक मान्य होण्यासाठी 78 पट असणे आवश्यक आहे*

🌈 *तर या अगोदरच तीन मान्य शिक्षक मान्य असतील तर 61 पेक्षा कमी पट असलेल्या शाळेत 2 शिक्षक मान्य करण्यात आले आहे*
🌈 *ज्या शाळेत वर्ग 6 ते 7/8 मध्ये एकूण 20 पेक्षा कमी विद्यार्थी आहेत तेथे शून्य शिक्षक मान्य करण्यात आलेले आहे या विद्यार्थ्यांना आता दाखले घेऊन दुसऱ्या शाळेत जावे लागणार आहे*
🌈 *यामुळे राज्यात समाज शास्त्र भाषा विषयाची हजारो पदें कमी होणार असून असंख्य शिक्षक अतिरीक्त होणार आहे*

🌈 *यापूर्वी च्या शासन निर्णय नुसार 6 ते 8 वर्गाची 36 पट संख्या असल्यास तीन शिक्षक मिळत होते*
🌈 *6 ते 8 या तीन वर्गास भविष्यात दोनच शिक्षक राहणार असून तासिके चा भार वाढणार आहे त्यामुळे विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल त्याच बरोबर शालेय कामकाजावर सुद्धा परिणाम झाल्यामुळे भविष्यात 8 वा वर्ग बंद पडून उच्च प्राथमिक चे वर्ग सुद्दा बंद पडणार आहे*

🌈 *2009 अगोदर 5 ते 7 वर्गाला 45 विद्यार्थ्यांना 4 शिक्षक शिकवत होते आता 77 विद्यार्थ्यांना फक्त 2 शिक्षक शिकवतील*

🌈 *मित्रहो आज सरसकट वेतनश्रेणी मागणाऱ्या शिक्षकांना वेतनश्रेणी सुद्धा मिळणे दुरापास्त होणार आहे*
🌈 *तसेच शासन निर्णयानुसार पदाच्या संरक्षणाचे निकष ऑनलाईन सॉफ्टवेअर मध्ये पालन न झाल्यामुळें वर्ग 1 ते 5 व 6 ते 8 चे अनेक शिक्षक अतिरीक्त ठरले आहे*
🌈 *सदर शासन निर्णयात बदल करणे आवश्यक*

*महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक संघटना शाखा बुलढाणा*

Join Now