शिक्षकेत्तर कर्मचारी संचमान्यतेबाबत sanchmanyata

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षकेत्तर कर्मचारी संचमान्यतेबाबत sanchmanyata

संदर्भ :१) शासनाचे समक्रमांकीत दि.२१.०२.२०२४ रोजीचे पत्र.

२) आपले पत्र जा क्र. शिसंमा/२०२३-२४/टि-८/संचमान्यता/२२१७, दि.१९.०४.२०२४.

३) आपले पत्र जा क्र. शिसंमा/२०२३-२४/टि-८/संचमान्यता/२२९६, दि.२५.०४.२०२४

राज्यातील सर्व खाजगी अनुदानित/अर्शता अनुदानित माध्यमिक/उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शासन निर्णय दि.२८.०१.२०१९ अन्वये निश्चित केलेल्या सुधारित आकृतीबंधानुसार व त्यानुसार व्यपगत होणारी पदे, अतिरिक्त ठरणारी पदे, त्या पदावरील कार्यरत कर्मचारी यांच्यासंदर्भात करावयाच्या कार्यवाही संदर्भात दि.०७.०३.२०१९ च्या शासन निर्णयान्वये विहीत केलेल्या कार्यपध्दतीनुसार शिक्षकेत्तर पदांच्या संचमान्यता व त्याअनुषंगाने इतर आवश्यक कार्यवाही करण्याबाबत आपणास संदर्भाधीन पत्र क्र.१ अन्वये कळविण्यात आले आहे.

प्रस्तुत प्रकरणी आपल्या संदर्भाधीन क्र.२ व ३ पत्रांच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, ३० सप्टेंबर, २०२३ ची ऑनलाईन आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या विचारात घेवुन, दि.२८.०१.२०१९ च्या आकृतीबंधानुसार एकूण मंजूर पदांच्या मर्यादेत व जिल्हानिहाय अनुज्ञेय होणाऱ्या पदांच्या मर्यादेत संस्थांना पदे अनुज्ञेय करुन सन २०२३-२४ च्या शिक्षकेत्तर संचमान्यता तात्काळ कराव्यात. तसेच, आकृतीबंधानुसार व्यपगत होणारी पदे, अतिरिक्त ठरणारी पदे, त्या पदावरील कार्यरत कर्मचारी यांच्यासंदर्भात शासन निर्णय दि.०७.०३.२०१९ अन्वये विहीत केलेल्या कार्यपध्दतीनुसार कार्यवाही करावी.

sanchmanyata
sanchmanyata

Leave a Comment