माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी समृद्धी कार्यक्रम (सन २०२४-२५) आयोजन करणेबाबत samruddhi inaugration 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी समृद्धी कार्यक्रम (सन २०२४-२५) आयोजन करणेबाबत samruddhi inaugration 

प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी रंगोत्सव कार्यक्रम व माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी समृद्धी कार्यक्रम (सन २०२४-२५) आयोजनाच्या अनुषंगाने ऑनलाईन मिटिंगला उपस्थित राहणे बाबत…

संदर्भः १. मा. राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.प., मुंबई यांचे निधी मान्यतेचे कार्यालयीन आदेश जा.क्र. मप्राशिप/सशि/लेखा/Rangotsav/ELE-REC/SCERT/२०२४- २५/२६७६, दि.०६/०९/२०२४.

२. GOI, MOE, Dept. Of School Education & Literacy, Samagra Shiksha PAB Minutes F.No.१०-१/२०२४-IS.१, Dated ५ March २०२४.

माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी समृद्धी कार्यक्रम राबवणे बाबत शासन निर्णय येथे पहा Click Here 

३. मा. राष्ट्रीय समन्वयक, कला उत्सव व समृद्धी कार्यक्रम, NCERT NEW DELHI, यांचे पत्र जा.क्र. F.N०.१०-१/DEAA/SAMRIDDHI/१८६५, दि. २१ नोव्हेंबर २०२४.

४. मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे पत्र जा.क्र. मराशैसंप्रप/कलाक्रीडा/रंगोत्सव-समृद्धीप्रस्ताव/२०२४-२५/०५६६१, दि.०३/१२/२०२४.

५. मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे पत्र जा.क्र. मराशैसंप्रप/कलाक्रीडा/रंगोत्सव, समृद्धी/२०२४-२५/०५६६२, दि.०३/१२/२०२४.

उपरोक्त विषय व संदर्भीय पत्रानुसार, शाळांतील इयत्ता ३री ते इयत्ता ८वी च्या विद्यार्थी/शिक्षकांसाठी राज्यस्तर रंगोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. अनुभवात्मक शिक्षणाच्या द्वारे (Experiential Learning) शालेय विद्यार्थ्यांमध्ये सहयोग, स्वयं-पुढाकार, स्वयं-दिशा,

स्वयं-शिस्त, संघ भावना, जबाबदारी, एकता व देशाभिमानाची जाणीव व जागृती निर्माण करणे, विविध शारीरिक कृत्ती, साहस आणि प्रेरणा यांचा अनुभव विद्यार्थ्यांना घेण्याची संधी देणे, तसेच विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती आणि एकता या भावनांची जागरुकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

सदर रंगोत्सव कार्यक्रम जिल्हा व राज्यस्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या इयत्ता ३री ते इयत्ता ८वी च्या शाळांसाठी खुला आहे. तसेच समृद्धी कार्यक्रम जिल्हा व राज्यस्तरावर आयोजित करण्यात येत असून सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या इयत्ता ९वी ते इयत्ता १२वी च्या शाळांसाठी खुला आहे.

उपरोक्त कार्यक्रमाच्या अनुषंगाने क्षेत्रीय अधिकारी, शिक्षक यांना सदर ऑनलाईन मिटिंग द्वारे सविस्तर माहिती दिली जाणार आहे. शिवाय माहितीचे सत्र यु ट्युब वर लाईव स्ट्रीमिंग करण्यात येणार आहे. सदर ऑनलाईन मिटिंगचे आयोजन दिनांक १९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२.०० वाजता करण्यात आले आहे. सदर ऑनलाईन मिटिंगची(Zoom meeting) लिंक पुढील प्रमाणे आहे https://zoom.us/j/94302998651 (Meeting ID 94302998651, Pass Code-675140) या लिंक वर क्षेत्रीय अधिकारी यांनी जॉईन व्हावे. तसेच यु ट्युब द्वारे लाईव स्ट्रीमिंगला मुख्याध्यापक (प्राथमिक/माध्यमिक) व शिक्षक (प्राथमिक/माध्यमिक) यांनी जॉईन व्हावे. सदर यु ट्युब द्वारे लाईव स्ट्रीमिंगची लिंक पुढील प्रमाणे https://youtube.com/live/mA8yZ13X1cE?feature=share आहे.

तरी उपरोक्त ऑनलाईन मिटिंगला आपण स्वतः उपस्थित राहावे व आपल्या अधिनस्त सर्व क्षेत्रीय अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक (प्राथमिक/माध्यमिक) यांना सदर ऑनलाईन मिटिंगला उपस्थित राहणेबाबत आपलेस्तरावरून आदेशित करण्यात यावे.

ult