राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील सखी सावित्री समितीच्या गठणाबाबतची माहिती सादर करणेबाबत sakhi savitri samiti gathan
राज्यातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील सखी सावित्री समितीच्या
गठणाबाबतची माहिती सादर करणेबाबत संदर्भ :-१) शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०२२/प्र.क्र. ३९/एसडी ४, दिनांक १०/०३/२०२२
२) या कार्यालयाकडील पत्र जा.क्र. प्राशिसं / ८०२/सखी सावित्री समिती/संकीर्ण/५८५६० दिनांक -०२/०१/२०२४
३) मा. अवर सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे कार्यालयीन पत्र जा.क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र. २८१/एसडी-४, दिनांक ०४/०९/२०२४
उपरोक्त संदर्भीय पत्राचे अवलोकन व्हावे,
शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक १०.०३.२०२२ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला- मुलीच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समता मुलक वातावरण निर्मितीसाठी विविध स्तरावर सखी सावित्री समिती गठन करणेबाबत शासना मार्फत निर्देश जारी केलेले आहे. सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने राज्यात शाळा, केंद्र व तालुका/शहर साधन केंद्र स्तरावर गठीत झालेल्या सखी सावित्री समिती बाबत अद्यावत माहिती सादर करणेबाबत आपणास संदर्भ क्र. २ च्या पत्रान्वये कळविण्यात आले होते. परंतु अद्याप आपले विभागाकडील एकत्रित माहिती संचालनालयास प्राप्त झालेली नाही.
संदर्भीय पत्र दिनांक ०४/०९/२०२४ च्या शासन पत्रानुसार राज्यातील विभागनिहाय सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या किती शाळांमध्ये सदर समितीचे गठन झालेले आहे व त्या कार्यान्वित आहेत अथवा नाही याबाबतची संख्यात्मक माहिती शासनास सादर करावयाची असल्याने आपल्या विभागाकडील एकत्रित माहिती दिनांक २३/१०/२०२४ रोजी दुपारी १.०० वाजेपर्यंत कार्यालयीन email depmah2@gmail.com वर संचालनालयास सादर करावी.