रजेचे प्रकार व रजा नियमांबाबत महत्वाची माहिती rules of leave

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रजेचे प्रकार व रजा नियमांबाबत महत्वाची माहिती rules of leave

भाग १ दीर्घ सुटी विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या रजा :

१) अर्जित रजा / परावर्तीत रजा

(शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर)

[ ज्यांना दीपावली व मे महिन्याची सुटी असते असे कर्मचारी]

अ)

ज्यांची नियुक्ती दिनांक ३०.०६.१९९५ पूर्वीची आहे त्यांना ३०.०६.१९९५ पर्यंत

सेवेस १ वर्ष पूर्ण झाले की २० दिवस अर्धपगारी रजा जमा होते ही अर्धपगारी रजा वैद्यकीय

कारणांसाठी पूर्ण पगारी परावर्तीत होते. म्हणजेच रजेच्या दुप्पट अर्धपगारी रजा खर्ची टाकली जाते.

या प्रकारची रजा जमा करण्याची पध्दत ३०.६.१९९५ रोजी संपली असून ही शिल्लक रजा, याच नियमा नुसार या रजा खात्यात शिल्लक असलेली रजा संपेपर्यंत उपभोगता येते. या रजेसाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

ब) १.०७.१९९५ पासून वरील अर्धपगारी रजे ऐवजी विशेष अर्जित रजा सुरु झाली. प्रत्येक

जुलै व जानेवारी महिन्यात आगाऊ ५ दिवस जमा करावी म्हणेच वर्षाला १० दिवस अर्जित रजा जमा

होते. या रजेसाठी वैद्यकिय प्रमाणपत्राची जरुरी नसते. कोणत्याही कारणांसाठी ही रजा घेता येते.

आगाऊ जमा केलेल्या जाने ते जून किंवा जुलै ते डिसेंबर या ६ महिन्यात बिनपगारी रजा झाल्यास

१२ बिनपगारी रजेस १ दिवस या प्रमाणात अर्जित रजा कमी करणे (कृपया सेवापुस्तकातील ३७

रकान्यांचा सुधारित रजा हिशेब पहा)

ही रजा कितीही साठवता यते. ही रजा विकता येत नाही (रजेचे रोखिकरण होत नाही)

२) किरकोळ रजा

शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर वर्षाला १२ दिवस लिपिक, शिपाई, नाईक, ग्रंथपाल यांना वर्षाला ०८ दिवस म. खा. शा. कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१-१६ (४) प्रमाणे शैक्षणिक वर्ष हे किरकोळ रजेचे वर्ष आहे. जून ते मे हा १२ महिन्यांचा कालावधी किरकोळ रजेस जोडून मागे किंवा पुढे किंवा दोनही प्रकारे दोन पेक्षा जास्त सुटी जोडता येणार नाही. अशा सुटीचे दिवस किरकोळ रजा म्हणून गणले जातात. दोन किरकोळ रजा कालावधीच्या दरम्यान येणारा रविवार किंवा सुट्या या किरकोळ रजेचा भाग असल्याचे समजण्यात येते

३) प्रसुती रजा:

स्थायी महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवस पूर्ण पगारी रजा मंजूर होते.

मोठ्या सुटीत (दीपावली / मे महिना) या महिन्यात प्रसुतीची तारीख आली तर प्रसूतीच्या तारखे पासून प्रसूती रजा सुरु होते. शिक्षण सेवकांना किरकोळ रजे व्यतिरिक्त कोणतीही रजा नाही मात्र शिक्षण सेवक महिला

कर्मचाऱ्यांच्या बाबतीत प्रसूती रजा १८० दिवस देय आहे. या साठी पुढील प्रमाणे गणना होते. १ वर्षाच्या आतील सेवा असल्यास प्रसुती रजा बिनपगारी १ वर्षा वेक्षा जास्त पण २ वर्षांच्या आत सेवा असल्यास अर्धपगारी

२ वषर्षांपेक्षा जास्त सेवा असल्यास पूर्ण पगारी शासन निर्णय दि.८.३.२०१० अन्वये महिला शिक्षण सेवकांना तसेच महिला शिक्षकेतर कर्मच्यांच्या बाबतीत त्यांचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण करीत असतांना प्रसूती रजा घ्यावी लागल्यास शिक्षण सेवक पदाचा कालवधी त्या प्रमाणात वाढविणे आवश्यक आहे. असे आदेश आहेत. या मध्ये शासन निर्णय दिनांक २५.०३.२०१३ अन्वये ८ मार्च २०१० च्या शासन निर्णय शुध्दीपत्रका नुसार वरील कालवधी त्या प्रमाणात वाढविणे ही अट शुध्दी पत्रकाच्या दिनांका पासून म्हणजेच २५.३.२०१३ पासून रद्द करण्यात आली आहे.

४) असाधारण रजा (बिनपगारी)

अस्थायी कर्मचाऱ्यास केवळ ३ महिन्यां पर्यंत असाधारण रजा मंजूर होऊ शकते. तसेच स्थायी कर्मचाऱ्यास ३ वर्षां पर्यंतची असाधारण रजा मंजूर करता येते. ही रजा संस्थेने मंजूर करावयाची आहे. वैयक्तीक कारणांसाठी असाधारण रजा घतलेली असल्यास ती अनअर्हताकारी रजा ग्राह्य होते व ती सेवानिवृत्ती व अन्य लाभांसाठी धरली जात नाही. मात्र वैद्यकिय कारणां साठी घेतलेली असाधारण रजा ही अर्हताकारी सेवा म्हणून गणता येते.

सुधारित अगाऊ रजा जमा करण्याच्या पध्दतीमध्ये कर्मचाऱ्याने सहामाहित असाधारण रजा घेतली असेल किंवा त्याच्या गैर हजेरीचा कालावधी अकार्यदिन समजण्यात आला असल्यास सदर रजेच्या कालावधीच्या १/३० या प्रमाणात कमी करण्यात येते.

पाचव्या वेतन आयोगा पर्यंत कर्मचाऱ्यांने घेतलेल्या असाधारण रजे एवढे दिवस वेतनवाढ पुढे ढकलण्यात येते.

सहाव्या वेतन आयोगा पासून वेतन वाढ पुढे ढकलण्याच्या बाबत पुढील कार्यवाही होते.

१) कर्मचाऱ्याने मागील वर्षाच्या जुलै पासून चालू वर्षाच्या ३० जून पर्यंत सहा महिने किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय असाधारण रजा घतलेली असल्यास त्यास चालू वर्षाच्या १ जुलैची वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय होईल

२) कर्मचाऱ्यांना मागील वर्षांच्या जुलै पासून चालू वर्षाच्या ३० जून पर्यंत सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय असाधारण रजा घेतलेली असल्यास त्यास चालू वर्षाच्या १ जुलैची वार्षिक वेतनवाढ देय न होता, ती पुढील वर्षाच्या दिनांक १ जुलै रोजी अनुज्ञेय होईल.

५) मुख्याध्यापकांना मिळणारी विशेष अर्जित रजा

मुख्याध्यापकांनी दीवाळी व उन्हाळ्याच्या सुटीत काम केले असल्याने त्या १ वर्षाच्या कालावधीनंतर १५ दिवस हक्काची अर्जित रजा मिळते. ही रजा सेवानिवृत्तीस विकता येते मात्र साधारणतः दीपावली २१ दिवस व उन्हाळी ४२ दिवस अशा ६३ दिवसांच्या सुटीत मुख्याध्यापकांनी किमान निम्मे दिवस कार्यालयात उपस्थित असणे अनिवार्य आहे.

दीर्घ सुटी सोडून काम करणाऱ्या द्यावयाच्या रजा :

(लिपिक, ग्रंथपाल, नाईक, शिपाई ज्यांना दीर्घ सूटी नसते असे कर्मचारी)

अ) शिक्षकेतरांसाठी किरकोळ रजा ८ (आठ)

ब) अर्धपगारी रजा वर्षास २० दिवस आहे. ही रजा कितीही साठविता येते. दिनांक १ जुलै १९९५ पासून ही रजा १ जानेवारी व १ जुलै ला १० दिवस अशी अगर

जमा करण्यात येते. जानेवारी ते जून किंवा जूलै ते डिसेंबर या ६ महिन्यात बिनपर 3/5 झाल्यास १२ बिनपगारी रजेस १ दिवस या प्रमाणात अर्जित रजा कमी करणे.

व) हक्काची अर्जित रजा

१५ जुलै १९८१ पर्यंत १ वर्ष पूर्ण झाल्यावर ३० दिवस या प्रमाणे १६ जुलै १९८१ ते ३१ डिसेंबर १९९२ अखेर ११ कामाच्या दिवसांसाठी १ दिवस या प्रमाणे

१ जानेवारी १९९३ पासून १ वर्षाला ३० दिवस या प्रमाणे १ जुलै १९९५ पासून प्रत्येक जुलै व जानेवारी महिन्यात आगाऊ १५ दिवस जमा होते. जानवारी ते जून किंवा जूलै ते डिसेंबर या ६ महिन्यात बिनपगारी रजा झाल्यास १८ बिनपगारी रजेस १ दिवस या प्रमाणात अर्जित रजा कमी करणे,

शिल्लक रजा जास्तीत जास्त ३०० दिवसा पर्यंत शिल्लक राहू शकते या रजचे सेवानिवृत्तीस रोखिकरण होते.

मात्र राजीनामा किंवा स्वेच्छा निवृत्तीचे बाबतीत शिल्लक रजेच्या निम्या दिवसांचे (जास्तीत जास्त १५० दिवस) रोखिकरण होते.

शिल्लक रजा जास्तीत जास्त १८० दिवस मर्यादा ३१ ऑगस्ट १९८८ पर्यंत

१ सप्टेंबर १९८८ ते ३१ जानेवारी २००१ पर्यंत २४० दिवस मर्यादा

१ फेब्रुवारी २००१ पासून ही मर्यादा ३०० दिवसांपर्यंत वाढविण्यात आली आहे.

क) असाधारण रजा: हे नियम वरील प्रमाणे शिक्षकेतरांनाही लागू आहेत.

ड) भरपाई किंवा बदली सूटी सुटीच्या दिवशी लेखी आदेश देवून कर्मचाऱ्यांस कामावर बोलविण्यास आल्यास व त्या प्रमाणे त्या दिवशी इतर दिवसांच्या कामाच्या तासाइतकेच प्रत्यक्ष काम केलेले असेल तितक्या दिवसांच्या संख्ये इतकी बदली सूटी असते.

अशा बदली सुट्या तीन दिवसांपक्षा जास्त साचू देवू नयेत.

अशी बदली सूटी पुढील कॅलेंडर वर्षात जमेस धरु नये

अशी बदली सूटी रविवार / सार्वजनिक सुटीच्या आणि त्यास देय असलेल्या रजेच्या पूर्वी किंवा नंतर दोन्ही प्रकारे जोडून घेता येईल.

जन गणनेच्या कामाची मिळालेली भरपाई विशेष रजा हक्काच्या अर्जित रजेत जमा करण्यात येते मात्र ही रजा रोखिकरण करता येत नाही,

अन्य विशेष रजा :-

या रजा घेतल्याची नोदं सेवापुस्तक / रजा हिशेब या मध्ये कराव्यात मात्र रजा

१) रक्तदान केल्यास १ दिवस

२) नसबंदी शस्त्रक्रिया केल्यास ६ दिवस

३) स्त्रीया- निर्बिजीकरण गर्भाशय शस्त्रक्रिया (बाळांतपणा व्यतिरिक्त १४ दिवस)

४) गर्भस्त्राव किंवा गर्भपात किंवा वैद्यकिय गर्भसमापन या बाबत रजा सहा आठवड्यां पर्यंत

५) कुत्रा चावल्यास – तीन आठवड्यांपर्यंत

क्षय / कर्करोग / पक्षघात या साठी सर्व प्रकारच्या रजा संपल्या नंतरच १ वर्षापर्यंत पूर्ण पगारी रजा दुसऱ्या वर्षी अर्धपगारी व तीसऱ्या वर्षी असाधारण रजा (बिन पगारी) या साठी मात्र सिव्हीलसर्जन यांचा दाखला प्रत्यक ४ महिन्यात सादर करणे आवश्यक आहे,

कर्मचाऱ्याने राजीनामा देवून संस्था बदल केल्यास किंवा परत त्याच संस्थेत सेवेत प्रवेश केल्यास मागील रजा व सेवाज्येष्ठता यांचे वरील हक्क संपत असल्याने मागील जमा रजा पुढे हिशेबात धरता येणार नाही.

वरील माहिती ही शालेय विभागास लागू असणारी परिपत्रके, माध्यमिक शाळा संहिता, म.रा. खा. शाळा शेवाशर्ती, म.ना.सेवा (रजा) नियम इ. मधून संकलित केले आहे. या बाबतची महत्वाची परिपत्रके खाली देत आहे.