आरटीई २५ टक्के प्रतिक्षा यादीतील तिसऱ्या फेरीच्या बाबत rte addmission third list
संदर्भः- १. मा. उच्च न्यायालय मुंबई, जनहित याचिका (एल)/ क्र.१४८८७/२०२४, जनहित याचिका (एल) क्र.१५५२०/२०२४
२. शासन पत्र क्र. आरटीई २०१९/प्रक्र.२५/एसडी-१ दिनांक १०.०५.२०२४
३. संचालनालयाचे पत्र क्र. प्राशिसं/प्र.प्र/rte addmission आरटीई-५२०/२०२४-२५/४९४५,दि.१९/७/२०२४.
४. संचालनालयाचे पत्र क्र. प्राशिसं/प्र.प्र/आरटीई-५२०/२०२४-२५/५२१०, दि.०१.०८.२०२४ ५. संचालनालयाचे पत्र क्र. प्राशिसं/प्र.प्र/आरटीई ८०१/२०२४-२५/५२७६,दि.०५.०८.२०२४
६. संचालनालयाचे पत्र क्र. प्राशिसं/प्र.प्र/आरटीई-८०१/२०२४-२५/५४९७, दि.१४.०८.२०२४
७. संचालनालयाचे पत्र क्र. प्राशिसं/आरटीई ८०१/२०२४/५६८७, दि.२६/०८/२०२४
Rte application बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेच्या प्रतिक्षायादीतील मुलांची प्रवेश प्रक्रीया दिनांक २९.०८.२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
तथापि याबाबत आपणास कळविण्यात येते की,right to education सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेच्या प्रतिक्षायादीतील तिसरी प्रवेशफेरी दिनांक ०५.०९.२०२४ ते १२.०९.२०२४ पर्यंत सुरु करण्यात येत आहे. तरी आरटीई २५ टक्के प्रतिक्षायादीतील प्रवेश प्रक्रीयेचे कामकाज संबंधीतांनी पूर्ण करुन घ्यावेत.