सन २०२५-२६ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत right to education school entry age
संदर्भ :- १. शासन निर्णय क्र. आरटीई-२०१९/प्र.क्र.११९/एस.डी.-१. दि. २५-०७-२०१९ २. शासन निर्णय क्र. आरटीई-२०१८/प्र.क्र.१८०/एस.डी.-१, दि. १८-०९-२०२०.
उपरोक्त संदर्भ क्र. ०१ च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन २०२५-२६ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे.
शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दि. १८-०९-२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये मानवीन दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला आहे. शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे. संदर्भीय शासन निर्णयान्वये पूर्व प्राथमिक व इयत्ता १ली मधील शाळा प्रवेशासाठीचे किमान वय खालीलप्रमाणे निश्चत करण्यात येत आहे.
शासन निर्णय दि. २५-०७-२०१९ नुसार शाळा प्रवेशासाठीचे किमान वयामध्ये जास्तीत जास्त १५ दिवसांची शिथिलता देण्यात आलेली आहे. तरी उपरोक्त प्रमाणे आरटीई २५ टक्के सन २०२५-२६ च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये आवश्यक ती सुधारणा करण्यात यावी.