आरटीई प्रवेश अर्ज भरण्यासाठी १० मेपर्यंत मुदत सुविधा : आतापर्यंत ७०२ अर्ज दाखल right to education RTE 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आरटीई प्रवेश अर्ज भरण्यासाठी १० मेपर्यंत मुदत सुविधा : आतापर्यंत ७०२ अर्ज दाखल right to education RTE 

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के जागांवर प्रवेश घेण्यासाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन प्रवेश अर्ज दखल करण्यासाठी १० मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मागील पंधरा दिवसात पोर्टलवर केवळ ७०२ अर्ज दाखल झाले आहेत.

आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेला यावर्षी पालकांकडून मिळणारा प्रतिसाद मंदावला आहे. यामुळे ऑनलाइन पोर्टलवर अर्ज भरण्याकडे विद्यार्थ्यांच्या पालकांनी फिरविल्याचे आहे. पाठ बोलले जात

आरटीईचे प्रवेश अर्ज भरण्यास १६ एप्रिलपासून सुविधा देण्यात आली आहे. उपलब्ध करून

३० एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची सूचना देण्यात आली होती. या मुदतीत जिल्हयातील पालकांनी केवळ ७०२ पाल्यांचे ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. त्यानंतर शिक्षण विभागामार्फत ही मुदत वाढविण्यात आली आहे. आता पालकांना १० मेपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करता येणार आहेत.

मात्र, पालकांचा या प्रवेश प्रक्रियेला मिळत असलेला प्रतिसाद कमी

असल्याने यावर्षी जागांच्या तुलनेत दाखल अर्जाचे प्रमाणही कमी राहण्याची शक्यता आहे.

आरटीई मध्ये शासकीय आणि अनुदानित शाळांचा समावेश केल्याचा हा परिणाम आहे. पालकांनी या निर्णयामुळे मात्र नाराजी व्यक्त केली आहे. शासनाने या निर्णयाबाबत फेरविचार करावा अशी मागणी धुळे जिल्ह्यातील पालकवर्गातून जोर धरून आहे. त्यांनी आपले गाऱ्हाणे लोकप्रतिनिधींकडेही मांडले आहे.

तर पालकांची प्रवेशाकडे पाठ

जिल्ह्यात १३४४ शाळांमध्ये २१ हजार २६६ राखीव जागा असताना केवळ ७०२ विद्याथ्यर्थ्यांचे ऑनलाइन अर्ज दाखल झाल्याने पालकांनी या प्रक्रियेकडेच पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. यावर्षी आरटी प्रक्रियेला उशीर झाला आहे. फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होणारी ही प्रक्रिया यंदा एप्रिल महिन्याच्या अखेरच्या पंधरवाड्यात सुरू करण्यात आली. यामुळेही पालकांचा अल्प प्रतिसाद असल्याचे दिसून येत आहे. आता १० मेपर्यंत मुदतवाढ दिल्याने किती अर्ज दाखल होतात याकडे लक्ष लागले आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लॉटरी प्रक्रिया आणि त्यानंतर निवड प्रक्रिया होणार आहे. शेवटी प्रतीक्षा यादीतील प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले.

right to education RTE 
right to education RTE

Leave a Comment