RTE अंतर्गत २५ टक्के ऑनलाईन मोफत प्रवेश प्रक्रियेची सोडत सन २०२५-२६ शासन निर्णय right to education addmission process
महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे
जा. क्र. आरटीई २५%/२०२५/८०१/५६८
दि. ०६-०२-२०२५
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२. शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई मनपा
३. शिक्षण निरिक्षक बृहन्मुंबई (उत्तर/दक्षिण/परिश्चम)
४. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. सर्व
विषय :- आरटीई २५ टकके ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची सोडत सन २०२५-२६.
उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सन २०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची सोडत (लॉटरी) सोमवार दि. १०-०२-२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे येथे काढण्यात येणार आहे. सदर सोडतीचे थेट प्रक्षेपण व्ही.सी. द्वारे करण्यात येणार आहे. आपण स्वतः या कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थित रहावे. आपणांस व्ही.सी. ची लिंक यथावकाश उपलब्ध करुन देण्यात येईल.
तरी सन २०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या सोडतीची व्यापक स्वरुपात मोफत प्रसिध्दी आपल्यास्तरावरुन देण्यात यावी.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे