सेवानिवृत्त होणा-या शासकीय कर्मचा-याला सेवानिवृत्ती विषयक लाभ वेळेवर अदा करणेकरीता विशेष मोहिम retirement servant labha
सेवानिवृत्त होणा-या शासकीय कर्मचा-याला सेवानिवृत्ती विषयक लाभ वेळेवर अदा करणेकरीता विशेष मोहिम दि.०३ फेब्रुवारी २०२५ ते दि.१४ फेब्रुवारी २०२५
वाचा :
– 1. वित्त विभागाकडील शासन परिपत्रक संकीर्ण-२०१९/३९/प्र.क्र.१७/सेवा-७, दि.०९ सप्टेबर २०१९.
2. या कार्यालयाकडील परिपत्रक जा.क्र.पीईएन/अजी-१६/कृआ/सेनिप्र/२७५४७/२०२३, दि.२३.०८.२०२३.
3. या कार्यालयाकडील परिपत्रक जा.क्र. पीईएन/अजी-१६/कृआ/सेनिप्र/२-४९९/२०२३, दि.२८.१२.२०२३
सेवानिवृत्त होणा-या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना निवृत्ती वेतन विषयक लाभवेळेत प्रदान करणेबाबत संदर्भीय परिपत्रक दि.२३.०८.२०२३ व दि.२८.१२.२०२३ अन्वये सूचना दिलेल्या आहेत. तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२ च्या नियम ११८ ते १२५ मधील तरतूदीचे पालन काटेकोरपणे करण्याच्या सूचना देवुनही ब-याच विागीय, जिल्हास्तरावरील व क्षेत्रिय कार्यालय प्रमुखाकडून सूचनांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आलेले आहे. परिणामी निवृत्ती वेतन विषयक लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी मा. लोकायुक्त, मा.उपलोकायुक्त, शासन व कृषि आयुक्तालयस्तरावर प्राप्त होत आहेत व काही प्रकरणी विलंबाबाबत सेवानिवृत्त कर्मचा-याकडुन व्याजाचीही मागणी होत आहे, ही बाब निश्चीत अत्यंत गंभीर आहे.
२. वरील परिस्थिती टाळण्यासाठी कृषि विभागांतर्गत सर्व कार्यालयाकडे सध्या प्रलंबित असलेली सेवानिवृत्ती वेतन प्रकरणे व पुढील सहा महिन्यात सेवानिवृत्त होणारे अधिकारी / कर्मचारी यांची सेवानिवृत्ती विषयक प्रकरणाबाबत तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे. याअनुषंगाने सर्व
कार्यालयाने त्यांचेकडे प्रलंबित असलेल्या सेवानिवृत्त प्रकरणाचा आढावा घेण्यात यावा आणि दि.०३ फेब्रुवारी २०२५ ते दि.१४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीमध्ये विशेष मोहिम (Special Drive) व्दारे सर्व सेवानिवृत्ती विषयक प्रकरणांचा निपटारा करण्यात यावा.
३. सेवानिवृत्ती प्रकरणाचा जलद निपटारा करणेकरीता विशेष मोहिम कालावधीत (दि.०३ फेब्रुवारी २०२५ ते दि.१४ फेब्रुवारी २०२५) खालील प्रमाणे कार्यवाही करणेत यावी :-
III. सर्व कार्यालय प्रमुखांनी त्यांचेस्तरावर माहे जानेवारी २०२५ पर्यंत सेवानिवृत्त झालेले अधिकारी / कर्मचारी यांचे प्रलंबित असलेल्या सेवानिवृत्ती वेतन विषयक प्रकरणाचा प्रकरणनिहाय आढावा घेण्यात यावा. विभागीय चौकशी चालू असलेली प्रकरणे वगळता उर्वरीत सर्व सेवानिवृत्ती वेतन विषयक प्रकरणाचा प्रस्ताव मा. महालेखाकार यांना दि.२८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सादर करण्यात यावा.
IV. माहे जून-२०२५ पर्यंत सेवानिवृत्त होणारे अधिकारी कर्मचारी यांचे सेवानिवृत्ती वेतन प्रस्तावाबाबत तांतडीने कार्यवाही करणेत यावी व सदर प्रस्ताव दि.३१ मार्च २०२५ पर्यंत मा. महालेखाकार कार्यालयाकडे मंजूरीसाठी पाठविण्यात यावा.
४. विशेष मोहिम कालावधीनंतर सेवानिवृत्ती वेतन विषयक करावयाची कार्यवाही :-
1) महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम १९८२ मधील नियम ११८ व १२० नुसार प्रत्येक विभाग व कार्यालय प्रमुखांनी दर सहा महिन्याप्रमाणे दर वर्षी ०१ जानेवारी व ०१ जुलै रोजी पुढील २४ महिन्यात सेवानिवृत्त होणा-या सर्व शासकीय अधिकारी / कर्मचा-यांची यादी तयार करावी व अधिकारी / कर्मचारी यांचे निवृत्तीवेतन विषयक कार्यवाही सुरु करावी. सेवानिवृत्ती विषयक कागदपत्रे पुर्ण करतांना सेवेची पडताळणी करणे, वेतन पडताळणी करणे, कर्मचा-याकडुन आवश्यक ती माहिती विहीत नमुन्यात भरुन घेणे, विभागीय कशी व ना-मागणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घेणे इत्यादीबाबत पूर्तता करुन कार्यालय प्रमुख यांनी शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे सेवानिवृत्तीच्या तारखेपूर्वी ६ महिन्याच्या आंत संबंधित मा. महालेखापालांकडे सेवानिवृत्ती वेतन प्रकरण ऑनलाईन पाठविणे आवश्यक आहे.
II) सेवानिवृत्ती वेतन प्रकरणाचा विहीत वेळेत निपटारा होणेकरीता उपविभागीय कृषि अधिकारी/ जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी / विभागीय कृषि सहसंचालक व इतर वरिष्ठ
कार्यालयांनी त्यांचे अधिनस्त कार्यालयांचा त्रैमासिक आढावा घ्यावा. जिल्हयांनी सोबत विवरणपत्रात प्रलंबित सेवानिवृत्त प्रकरणाची माहिती घेऊन विभागीय कार्यालयास सादर करावी व विभागीय कार्यालयाने जिल्हानिहाय माहिती कृषि आयुक्तालयास सादर करावी.
५. सर्व विभाग / कार्यालयप्रमुखांना उपरोक्त परिपत्रकान्वये देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जाईल. याबाबत आवश्यक ती दक्षता घ्यावी, अशी प्रकरणे प्रलंबित राहील्यास या संबंधितास सर्वोतोपरी जबाबदारी विभाग / कार्यालय प्रमुखांची राहील असे निदर्शनास आणून देण्यात येत आहे.