मतदान केंद्राध्यक्षांची जबाबदारी कोणती आहे?responsibility of Presiding officer 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मतदान केंद्राध्यक्षांची जबाबदारी कोणती आहे?responsibility of Presiding officer 

मतदान केंद्रावर केंद्रीय सहाय पोलीस दल किंवा पोलीस बंदोबस्त आहे की नाही याची सुनिश्चिती करणे

मतदान केंद्रावर सूक्ष्म निरीक्षक आणि डिजिटल कॅमेरा आंतरजालावरून प्रक्षेपण (वेब कास्टींग) सुविधा उपलब्ध आहे का हे पाहणे

कोणत्याही परिस्थितीत, मतदान युनिट किंवा नियंत्रण युनिट किंवा व्हीव्हीपॅट जमिनीवर ठेवू नये. ते टेबलावर ठेवले पहिजे; मतदान युनिट आणि व्हीव्हीपॅट यांना त्यांच्या संबंधित युनिटांशी जोडा.

मतदान साहित्य तपासून ताब्यात घेणे

मतदान केंद्र सज्ज करणे 100 मी. रेषा

मतदान प्रतिनिधी -1. नियुक्तीपत्रे तपासा 2. प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी द्या 3. प्रवेश द्या

मतदानापूर्वी मतदान यंत्र सज्ज करणे

43

44

अभिरूप मतदान MOCK POLL 2. नियंत्रण विभाग (रिझल्ट सेक्शन) सिलबंद करणे

मतदानास सुरूवात करण्यापूर्वी जोडपत्र 6 भाग एक मधील घोषणापत्र मोठ्याने वाचून त्यावर मतदान प्रतिनिधींच्या सह्या घेऊन स्वतःची स्वाक्षरी करणे

मतदान प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे

मतदान समाप्तीनंतर जोडपत्र 6 भाग तीन व चार मधील प्रतिज्ञापन करणे,

मतदान केंद्राध्यक्षाच्या दैनंदिनीमध्ये निवडणूक कार्य प्रमाणपत्र घेवून मतदान केलेल्या मतांची संख्या न चुकता नोंदविणे.

नोंदलेल्या मताचा हिशोब (नमुना 17 C) ची स्वाक्षरी केलेली प्रत प्रत्येक मतदान प्रतिनिधींना देणे व त्यावर त्यांच्या स्वाक्षरी घेणे

केंद्राध्यक्षाची दैनंदिनी, नोंदविलेल्या मतांचा हिशोब व कागदी मोहरांचा हिशोब इत्यादी बाबींची पुर्तता करून सर्व साहित्य नेमून दिलेल्या ठिकाणी जमा करणे.

मतदान केंद्रात प्रवेश पात्र व्यक्ती

46

1. मतदार

2. मतदान अधिकारी

3. प्रत्येक उमेदवार, त्याचा निवडणुक प्रतिनिधी (एकावेळी एकच प्रतिनिधी आत मध्ये उपस्थित राहू शकेल)

4. निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले व्यक्ती

5. कर्तव्यर्थ लोकसेवक

6. मतदारासोबत असलेले लहान मुल

7. जे मदतीशिवाय चालू शकत नाहीत व मतदान करु शकत नाही, अशा अंध अपंग मतदारासोबतच्या व्यक्ती.

8. मतदान केंद्राध्यक्ष मतदारांची ओळख पटवण्याच्या मतदान घेण्यास त्यास सहाय्य करण्याच्या प्रयोजनार्थ अशा इतर व्यक्ती

मतदान केंद्रात प्रवेश पात्र व्यक्ती

9. मतदान केंद्राध्यक्ष त्याला आवश्यकता भासल्यास उमेदवाराचे छायाचित्र असलेल्या ओळखपत्राची मागणी करेल.

10. मतदान केंद्राध्यक्ष मतदान प्रतिनिधींकडून ओळखपत्र तसेच त्यांच्या नियुक्तीपत्राची निवडणूक निर्णय अधिकारी यांनी साक्षांकीत केलेली दुय्यम प्रत घेईल.

11. उमेदवारासोबत अथवा मतदान प्रतिनिधीसोबत असलेल्या सुरक्षारक्षकास मतदान केंद्रात प्रवेश करता येणार नाही. फक्त Z+ सुरक्षा असलेल्या व्यक्तीसोबत असलेला सुरक्षारक्षक साध्या पोशाखात व शस्त्र दिसणार नाही, अशा रितीने प्रवेश करु शकेल.

12. मतदान केंद्रास भेट देणारे निरिक्षक, क्षेत्रीय अधिकारी, सुक्ष्म निरिक्षक, उमेदवार, RO, ARO, DEO यांनी भेटपुस्तिकेमध्ये (Visit Sheet) नोंद घ्यावी