जिल्हा परिषदेच्या वर्ग-3 कर्मचा-यांच्या,केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी संवर्गातील जिल्हांतर्गत बदल्याच्या धोरणाची अंमलबजावणी करणे बाबत request transfer
सर्वसाधारण बदल्या सन 2024 बाबत जिल्हा परिषदेच्या वर्ग-3 कर्मचा-यांच्या केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी संवर्गातील जिल्हांतर्गत बदल्याच्या धोरणाची अंमलबजावणी करणे बाबत
संदर्भ –
1. महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील शासन निर्णय क्र.जिपब-414/प्र.क्र.-112/आस्था-14, दि. 15/05/2014
2. ग्रामविकास विभागाकडील शुध्दीपत्रक क्र. जिपब-4816/प्र.क्र. 136/आस्था-14, दि.02/01/2017
3. महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील शासन निर्णय क्र. जिपब-4817/प्र.क्र.-228/आस्था-14, दि. 07/03/2019
4. या कार्यालयाचे पत्र क्र. कार्या-1/पीई-3/पदो/95/24 अ.नगर दि. 13/02/2024
5. मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जि.प.अ.नगर यांचेकडील जा.क्र.साप्रवि -3/2024/584/2024 दि.05/04/2024
ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील दि. 15/05/2014 व त्याअनुषंगाने निर्गत शासननिर्णयानुसार जिल्हा परिषदेकडील वर्ग-3 व वर्ग-4 (शिक्षक संवर्ग वगळून) कर्मचा-याच्या नियतकालीक जिल्हांतर्गत सर्वसाधारण बदली करणेची तरतुद आहे. सबब त्यानुसार सर्वसाधारण बदली प्रक्रिया-2024 करिता शिक्षण विभाग (प्राथमिक) जि.प. अहमदनगर अधिनस्त केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी वर्ग-3 या संवर्गाच्या बदल्यांबाबतची कार्यवाही करणे आवश्यक आहे.
करिता उक्त शासननिर्णयातील तरतुदीनुसार शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद अहमदनगर अधिनस्त केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी वर्ग-3 संवर्गाची तात्पुरती वास्तव्य सेवाज्येष्ठता सुची तयार करणेकामी कार्यरत केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी वर्ग-3 संवर्गातील कर्मचा-यांची सेवाविषयक बाबीची माहीती मागविण्यात आलेली आहे. तथापी मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद अहमदनगर यांनी दिनांक 05/04/2024 चे पत्रान्वये जिल्हा परिषदेकडील वर्ग-3 व वर्ग-4 (शिक्षक संवर्ग वगळून) कर्मचा-याच्या नियतकालीक जिल्हांतर्गत सर्वसाधारण बदली 2024 करिता कार्यपध्दती व कालमर्यादा निश्चित केलेली आहे. तरी सदर पत्राचे सुक्ष्म अवलोकन करावे.
मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) यांचेकडील दि.05/04/2024 चे पत्रान्वये देण्यात आलेल्या
निर्देशानुसार आपण खालील प्रमाणे निश्चित केलेल्या कार्यमर्यादेत कार्यवाही करावी.
तरी सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी वरील कालमर्यादेत उक्त प्रमाणे निश्चित केलेले कामकाज पुर्ण करावे तसेच बदली बाबतचे विनंती अर्ज व त्याअनुषंगाने बदलीतुन सुटीकरिता अथवा विनंती बदलीचे लाभाकरिता सक्षम पुरावा दिनांक 22/04/2024 नंतर स्विकारु नये. सदरील अर्जाचा यास्तरावरुन वरुन विचार करण्यात येणार नाही त्याकरिता सर्व कार्यालयप्रमुखांनी विनंती अर्जावर व बदलीकरिता सुट घेणेकरिता दिलेल्या अर्जावर कार्यालयाची दाखल तारखेची मोहर ठळकपणे नोंदवावी. तसेच यापुर्वी या कार्यालयाकडे केलेले अर्ज दप्तरी दाखल करण्यात येत असुन सदर कर्मचारी यांना पुनश्च कालमर्यादेत नव्याने अर्ज करणेबाबत आपलेस्तरावरुन अवगत करावे. विनंती बदलीचे लाभाकरिता अथवा प्रशासकीय बदलीतुन सुट घेणेकरिता सक्षम प्राधिकारी यांचे दस्तासंदर्भात माहीतीची प्रत यासोबत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर प्रकरणी कर्तव्यामध्ये कोणत्याही स्वरुपाचा कसुर अथवा हलगर्जीपणा होणार नाही याची प्रामुख्याने दखल घ्यावी.