रायगडातील २४० शिक्षकांची अखेर जिल्हा अंतर्गत बदली समुपदेशन प्रक्रियेद्वारे निवडली आवडती शाळा request teacher transfer
लोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग: रायगड जिल्हा परिषद प्रक्रियेला उपस्थित होते. २४२ शिक्षक शिक्षण विभागातील २४० शिक्षकांची समुपदेशनद्वारे प्रक्रिया राबवून जिल्हांतर्गत विनंती बदली प्रक्रिया राबविण्यात आली. पवित्र पोर्टल अंतर्गत झालेल्या शिक्षक भरतीपूर्वी जिल्हा अंतर्गत विनंती बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश शासनाच्या शिक्षण विभागातर्फे देण्यात आले होते. त्यानुसार ही प्रक्रिया रायगड शिक्षण विभागाने पूर्ण केली. या शिक्षकांना सोमवारी बदली आदेश देण्यात येणार राबविण्यात आहेत.
अलिबाग शहरातील भाग्यलक्ष्मी हॉलमध्ये जिल्हा अंतर्गत शिक्षकांची विनंती बदली प्रक्रिया शुक्रवारी घेण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग राजेंद्र भालेराव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अधिकारी प्रिया मोरे हे या बदली
हवी ती शाळा निवडण्याचा पर्याय
जिल्ह्याला पवित्र पोर्टलद्वारे नव्याने मिळालेल्या शिक्षकांना नियुक्ती देण्याआधी जिल्हा अंतर्गत शिक्षकाची विनंती बदली प्रक्रिया करण्याच्या सूचना शासनाकडून होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील १५ तालुक्यातील सर्व शाळा रिक्त जागा खुल्या ठेवल्या होत्या. शिक्षकाला ती शाळा निवडण्याचा पर्याय देण्यात आला होता. त्यानुसार २४० शिक्षकांनी हवी असलेली शाळा निवडली. नव्याने पवित्र पोर्टलद्वारे झालेल्या २५४ शिक्षकांची लवकरच रिक्त जागांवर नियुक्ती करण्यात येणार आहे.