जिल्हाअंतर्गत बदलसाठी जे शिक्षक पूर्वी पासून कार्यरत आहेत विकल्पानुसार एक संधी देऊन समुपदेशनाद्वारे रिक्त पदी नियुक्ती देणे बाबत request teacher transfer
विषयः – शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परिक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या बदली प्रक्रिया राबविण्या बाबत…
संदर्भ:- 1) मा. उपसचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्रमांक संकिर्ण-2024/प्र.क्र.45 आस्था-14 दिनांक 11/03/2024
उपरोक्त संदर्भिय विषयांन्वये शासन निर्णय दि. 21/06/2023 नुसार जिल्हाअंतर्गत बदलसाठी जे शिक्षक पूर्वी पासून कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छूक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन समुपदेशनाद्वारे रिक्त पदी नियुक्ती देणे बाबत नमुद केले आहे.
त्यानुसार जे प्राथमिक शिक्षक बदलीसाठी इच्छुक आहेत त्यांची नावे गटशिक्षणाधिकारी यांचे मार्फत विनंती बदलीच्या नियमानुसार दिनांक 30/04/2024 पर्यंत Excel Sheet मध्ये व एक प्रत उलट टपाली सादर करावी.
तसेच यापुर्वी ज्या प्राथमिक शिक्षकांनी परस्पर या कार्यालयात विनंती बदलीसाठी अर्ज केले आहेत ते विचारात घेण्यात येणार नसल्या बाबत कळविण्यात यावे.
संवर्ग भाग 2 मधील पती पत्नी पैकी कोणाही एकाने अर्ज केल्यास ज्या शाळेवर दोन जागा रिक्त आहे अशा ठिकाणी दोघांचीही बदली युनीट अंतर्गत होवू शकते का ? कृपया हा मुद्दा स्पष्ट करून सांगा किंवा विहीत बदली नमुना यात पतीपत्नी साठी युनीट म्हणून उल्लेख करावा