प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण मुद्देसूद सूत्रसंचालन/चारोळ्या republic day sutrasanchalan 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण मुद्देसूद सूत्रसंचालन/चारोळ्या republic day sutrasanchalan 

सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम

समता स्वातंत्र्य बंधुत्व अभिव्यक्ती स्वातंत्र्य धर्मनिरपेक्षता समाजवादी संविधानात आहे गुंफण मानवतेच्या कल्याणासाठी जगात श्रेष्ठ ठरले भारतीय संविधान हेच आहे प्रजासत्ताकाचे गुपित या भारतमातेला कोटी कोटी वंदन करू या… भारताला जगातील सर्व संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी कटिबद्ध होऊ

संविधाचा अमल करू या संविधानाचे पालन करू देश ख-या अर्थाने प्रजासत्ताक करुयात

मी सर्व प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतोव व आजच्या कार्यक्रमास सुरवात करतो ...

भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी क्रूर ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. तरीही, आपण ब्रिटिश कॉमनवेल्थचे भाग होतो.. दोन वर्षांनी अनेक सभा झाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी झाली, आणि भारत एक प्रजासत्ताक देश बनला. संविधानाने आपल्याला शिक्षण, भाषण,गोपनीयता आदी जीवनावश्यक मूलभूत अधिकार दिले. भाषणाच्या अधिकाराशिवाय आज आपण इथे जमलो नसतो.

भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती.

स्वप्न सगळेच बघतात,

स्वतः साठी इतरांसाठी !

आपण आज एक स्वप्न बघू या ;

देशासाठी, आपल्या सर्वांसाठी !

‘सुरक्षित भारत’ ‘सुविकसित भारत’

स्थानापन्न करणे

अध्यक्ष निवड

“एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा….कारण.. व्यक्ती ही कधीतरी संपते पण व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहते”.असेच उत्तम व्यक्तिमत्वाचे धनी आपल्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले आहेत

श्री.. …………………..हे कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्विकारतील अशी मी त्यांना विनंती करतो

आजचे आपले प्रमुख पाहुणे ……………… हे स्थान स्विकारतील अशी मी त्यांना विनंती करतो.

अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ आपल्याला लाभण्यासाठी आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडण्यासाठी जेष्ठांचे नेहमीच मार्गदर्शन हवे असते म्हणून आजच्या कार्यक्रमात हे मार्गदर्शक म्हणून स्थान स्विकारतील अशी मी त्यांना विनंती करतो

(प्रत्येक पाहुण्यांसाठी शब्द रचनेत थोडा बदल करावा)

प्रमुख पाहूणे :-

या वेळेस कार्यक्रमा बद्दल माहिती द्यावी

देशाभिमान मनात टिकून राहण्यासाठी आपण ज्याप्रमाणे धार्मिक सणवार उत्सव हे मोठ्या आनंदाने, कौतुकाने उत्साहाने साजरे करतो. त्या प्रमाणेच संपूर्ण भारतवासी काही राष्ट्रीय सण उत्सव सुद्धा साजरे करतो. त्यातील एक राष्ट्रीय सण म्हणजे दरवर्षी साजरा होणारा ‘प्रजासत्ताक दिन’ आपला भारत देश प्रजासत्ताक दिन साजरा करतो.

दीपप्रज्वलन/प्रतिमा पूजन

दिन डूबता है डूबने दो,आप शाम से ढलते रहिये

सुबह सूरज हथेलियों में होगा,चिरागों से जलते रहिये।

चलो फिर से आज वोह नजारा याद करले,

शहीदों के दिल में थी वो ज्वाला याद करले,

म्हणून मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहूणे यांना मी विनंती करतो की त्यानी सरस्वती पूजन, दिपप्रज्वलन करावे ख पाहूणे यांना भी प्रतिमा पूजन व तसेच मी. पूजन करून ध्वज वंदन करावे . यांना विनंती करतो की त्यांनी ध्वज

(काही ठिकाणी ध्वज वंदन आधी घेतल्या जाते म्हणुन तसे करुन इतर कार्यक्रम जसा च्या तसा करावा)

ध्वजारोहण ऑर्डर

➡️मुलांना उभ करणे

➡️सावधान

➡️विश्राम…. सावधान

➡️पाहूणे झेंडा वंदन साठी जातील

➡️ध्वज फडकवल्यावर

➡️झेंड्याला सलामी देणे

➡️सलामी राष्ट्रगीत होईपर्यंत देणे

➡️सलामी ऑर्डर देणे तर लगेचच राष्ट्रगीत

➡️राष्ट्र राष्ट्रगीत

➡️राष्ट्रगीत झाल्यावर नारे देणे

➡️ध्वज प्रतिज्ञा

➡️झेंडा गीत

(पुन्हा पाहूण्यांना मंचावर बसण्यास विनंती करणे व विद्यार्थ्यांना)

आपल्या राष्ट्राचा तेजस्वी इतिहास आणि श्रेष्ठतम संस्कृती आपण जाणून घेतली, तर आपल्यामध्ये राष्ट्राविषयी अभिमान निर्माण होईल. राष्ट्राविषयी अभिमान असेल, मनात राष्ट्रप्रेम असेल, तर राष्ट्राचे प्रतीक असणार्या प्रत्येक गोष्टीविषयीही आपल्या मनात आदर राहील. राष्ट्राची प्रतिके कोणती ? (मुलांना उत्तर विचारू शकतो.) राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, वन्दे मातरम् सारखे राष्ट्रीय गीत, राष्ट्राचा नकाशा (म्हणजेच मानबिंदू) ) ही आपली राष्ट्रीय प्रतिके आहेत. यांचा यथायोग्य सन्मान राखणे, हे आपले राष्ट्रकर्तव्य आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, आपण हे कर्तव्य पार पाडत आहोत का ? आज काय स्थिती आहे? अनेक ठिकाणी राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, आपल्या राष्ट्राचा नकाशा यांचा अवमान झालेला आपल्याला पहायला मिळतो ना ? आपल्या राष्ट्रप्रतिकांचा मान राखणे आणि त्यांचा कुठेही अवमान होत असेल, तर तो थांबवणे, या कृती आपल्याकडून झाल्यास त्यातून आपले राष्ट्रप्रेम दिसून जाईल. आपल्या राष्ट्राचे आदर्श नागरिक म्हणून आपली जी जी कर्तव्ये आहेत, त्यांचे आपण पालन करणे, हीसुद्धा आपली राष्ट्रभक्तीच होय. 

मान्यवरांचे स्वागत

टिकून राहो ऐक्य भारताचे येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी फडकत राहो सदा विजयी पताकाच गणराज्यदिनाच्या मंगलमय क्षणी तुम्हासाठी हा स्वागत सोहळा

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ……….. यांचे स्वागत ……… हे करतील अशी मी त्याना विनंती करतो हे

आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे करतील अशी मी त्याना विनंती करतो.

(सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत घ्यावे)

नसानसातून उसळू द्यावी, राष्ट्रप्रीती, राष्ट्रशक्ती… गौरवाया राष्ट्र अपुल्या प्रेम राष्ट्रावर करूया ।। तळपत्या राष्ट्रात अपुल्या, गान राष्ट्राचे, गाऊ उंच नेऊ राष्ट्र अपुलेमान अपुली उंचवूनी ।।

स्वागत गीत

अतिथी देवो भवः म्हणून फक्त पुष्प गुच्छाच स्वागत पुरेस ठरणार नसल्याने शब्द सुमनांनी स्वागत करण्यासाठी येत आहे.

व्यासपिठावरील पाहुण्यांची ओळख

आज आपले भाग्य म्हणून आपल्याला… ………..हे पाहुणे म्हणून लाभले आहेत म्हणून….. ………….व्यासपिठा करील पाहुण्यांचा परिचय करून देणे आवश्यक आहे त्यासाठी मी. यांना आमंत्रीत करतो.

२६ जानेवारी किंवा १५ आगॅस्ट हे दिवस साजरे झाल्यावर आपण पहातो की, राष्ट्रध्वज रस्त्यात, रस्त्याच्या कडेला इकडे-तिकडे पडलेले असतात; काही गटारात जातात, तर काही पायदळी तुडवले जातात. राष्ट्रध्वज उंच ठिकाणी फडकवणे, हे आपले राष्ट्र स्वतंत्र असल्याचे प्रतीक आहे. आदल्या दिवशी आपण राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रगीत म्हणतो, तेव्हा आपण या स्वतंत्र राष्ट्राचे नागरिक असल्याचा आपल्याला अभिमान वाटतो आणि दुसर्या दिवशी तोच राष्ट्रध्वज रस्त्यावर पडलेला, फाटलेला पाहून आपल्याला काहीच कसे वाटत नाही ? इतके आपले मन राष्ट्रध्वजााविषयी असंवेदनशील कसे होते ? मित्रांनो, आपल्या राष्ट्रध्वजाचा सदोदित सन्मान राखणे, हे आपले राष्ट्रकर्तव्य समजून आजपासून आपण राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी नेहमीच प्रयत्न करू, अशी प्रतिज्ञा करूया. आपल्या वर्गात, शाळेत, रस्त्यावर कुठेही राष्ट्रध्वज पडलेला दिसला, तर आपण तो उचलून शाळेत जमा करूया. किती जण ही कृती करणार ?

प्रास्ताविक

आजच्या कार्यक्रमाचा उद्देष, जाणूण घ्यावा प्रास्ताविकेतून.

आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशी मी त्याना विनंती करतो.

विद्यार्थी/शिक्षक भाषणे

इतर कार्यक्रम

आज देशभर प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो आहे. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताची ख्याती आहे. परंतु लोकशाही म्हणजे नेमकं काय? तर लोकशाही म्हणजे, प्रौढ मताधिकाराच्या आधारे, खुल्या व निःपक्षपाती निवडणुकांद्वारा लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींद्वारे चालणारे राज्य. अब्राहम लिंकन कृत व्याख्याः लोकांनी, लोकांच्या हिताकरिता, लोकांकरीता चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही.

लोकशाही हा ‘डेमॉक्रसी’ या इंग्रजी संज्ञेचा मराठी प्रतिशब्द. डिमॉस (Demos) म्हणजे सामान्य लोक आणि क्रसी (Cracy) म्हणजे सत्ता. अथेन्समध्ये लोकशाही राज्यपद्धतीचं बीज आढळतं. ग्रीकांप्रमाणे प्राचीन रोमनांनी प्रजासत्ताकाद्वारे रोममध्ये लोकशाहीचा प्रयोग केला. लोकशाहीचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लोकशाही असे दोन प्रमुख प्रकार सामान्यतः मानले जातात. आधुनिक काळात ‘लोकशाहीं’ हा शब्दप्रयोग सामान्यपणे अप्रत्यक्ष लोकशाही या अर्थानेच केला जातो.

लोकशाहीचे प्रकार : प्रातिनिधिक लोकशाहीचे संसदीय व अध्यक्षीय लोकशाही असे सांप्रत कार्यवाहीत असलेले दोन प्रमुख प्रकार आढळतात. संसदीय लोकशाहीमध्ये मंत्रिमंडळ आणि संसद परस्परांवर अवलंबून असतात आणि मंत्रिमंडळ हे संसदेला जबाबदार असते. बहुमतातील पक्षाचा नेता हा पंतप्रधान असतो. भारतासह ग्रेट ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलियात ही पद्धत रूढ आहे. अध्यक्षीय शासनपद्धतीत मंत्रिमंडळ संसदेपासून अलिप्त असतं आणि अध्यक्षाची जनतेकडून सरळ निवड होते. ही पद्धत प्रामुख्याने अमेरिकेत आढळते. थोड्याफार फरकाने फ्रान्स, श्रीलंका इ. देशांतूनही ती प्रचारात आहे.

पाहुण्यांची भाषणे

डोंगर कपा-यात वाढणा-या गवताला गरज असते ती पाण्याची

बोलके करण्यास हवे असते संभाषण आधारासाठी हवे असते ते आश्वासन योग्य दिशा मिळण्यासाठी

आवश्यक आहे मार्गदर्शन

प्रमुख कार्यक्रमाचे पाहूणे आपले विचार व्यक्त करतील.

झंडा लहराना है, वंदे मातरम् के गीत गाना है! सुन कर देश को ललकारना है, आओ मिलकर अब स्वप्न देखा जो साकार करना है!

अध्यक्षीय भाषण

तेज तुमचे आहे सुर्य-चंद्राहूनही जास्त………. तुमच्या या

बोलण्याच्या शब्दातच आहे………. जीवनाचे संपूर्ण सार

हे अध्यक्षीय भाषण

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष. करतील अशी मी त्याना विनंती करतो.

अध्यक्षीय भाषण :-

अध्यक्षांच्या प्रत्येक मुद्द्द्यावर समर्थन दर्शवावे ..

आओ देश का सम्मान करे शहीदो की शहादत याद करे एक बार फिर से राष्ट्रा की कमान.. हम हिन्दुस्तानी अपने हाथ धरे.. आओ.. गन्तन्त्र दिवस का मान करे

आभार प्रदर्शन

“दिव्याने दिवा लावत गेलं कि दिव्यांची एक दिपमाळ तयार होते, फुलाला फूल जोडत गेलं कि फुलांचा एक फुलहार तयार होतो..

आणि

माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं.. हे नात चिरकाळ टिकवण्यासाठी गरजेच असत त्यांचे वेळोवेळी आभार मानणे, आभारानेच हे नात फुलतं बहरतं

आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन……….. हे सादर करतील अशी मी त्याना विनंती करतो

मतभेद सारे विसरुया, बंधने सारी तोडूया, एक मनाने, एक भावनेने आज परत एकत्र येऊया लहरतो आहे तिरंगा अभिमानाने उंच आज या आकाशी उजळत ठेऊ सारे रंग त्याचे घेऊयात प्रण हा एक मुखाने….

जात, धर्म, रंग, वेष वर वरचे फरक सारे फक्त तिरंग्याचा धर्म, जात, रंग खरा चला आज पुन्हा एकत्र येऊ सारे…

चला करूयात या संविधानाचा आदर आज, ज्याने दिला आपणास जगण्याचा, शिकण्याचा अधिकार…

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा… धन्यवाद…

Join Now