भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन समारंभ-दि.२६ जानेवारी,२०२५ शासन परिपत्रक republic day celebration shasan nirnay 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन समारंभ-दि.२६ जानेवारी,२०२५ शासन परिपत्रक republic day celebration shasan nirnay 

शासन परिपत्रक महाराष्ट्र शासन

भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिनसमारंभ – दि. २६ जानेवारी, २०२५,शासन परिपत्रक क्र. सीईआर-२०२५/प्र.क्र.०३/राशि-१,सामान्य प्रशासन विभाग,राजशिष्टाचार शाखा, ३ रा मजला,मंत्रालय, मुंबई-४०००३२,दिनांक १८ जानेवारी, २०२५

दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी ०९-१५ वाजता आयोजित करण्यात यावा. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी ८-३० ते १०-०० वा. च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी ८-३० वा. च्या पूर्वी किंवा १०.०० वा. च्या नंतर करावा.

२. मा. राज्यपाल महोदय यांच्या हस्ते व मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीत सकाळी ९-१५ वाजता शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे प्रमुख समारंभामध्ये ध्वजारोहण व समारंभपूर्वक संचलन कार्यक्रम होईल.

३. विभागीय व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे मा. मंत्री / मा. राज्यमंत्री राष्ट्रध्वजारोहण करतील:-

जिल्ह्याचे नाव मा.मंत्री/मा.राज्यमंत्री
गडचिरोली मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस
ठाणे मा.श्री. एकनाथरावजी शिंदे
मुंबई शहर मा.श्री.एकनाथरावजी शिंदे
पुणे मा.श्री. अजित दादा पवार
बीड मा.श्री. अजित दादा पवार
नागपूर मा.श्री. चंद्रशेखर बावनकुळे
अमरावती मा.श्री. चंद्रशेखर बावनकुळे
अहिल्यानगर मा.श्री. राधाकृष्ण विखे पाटील
वाशिम मा.श्री. हसन मुश्रीफ 
सांगली मा.श्री. चंद्रकांत दादा पाटील
नाशिक मा.श्री. गिरीश महाजन
पालघर मा.श्री. गणेश नाईक
जळगाव मा.श्री. गुलाबराव पाटील
यवतमाळ मा.श्री. संजय राठोड
मुंबई उपनगर

मा.श्री. आशिष शेलार 

मा.श्री. मंगल प्रभात लोढा

रत्नागिरी मा.श्री. उदय सामंत
धुळे मा.श्री. जयकुमार रावल
जालना मा. श्रीमती.पंकजाताई मुंडे
नांदेड मा.श्री. अतुल सावे
चंद्रपूर मा.श्री. अशोक उईक 
सातारा मा.श्री. शंभूराज देसाई
रायगड कु.आदितीताई तटकरे
लातूर मा.श्री. शिवेंद्रसिंह भोसले
नंदुरबार मा.श्री. माणिकराव कोकाटे
सोलापूर मा.श्री. जयकुमार गोरे
हिंगोली मा.श्री. नरहरी झिरवाळ
भंडारा मा.श्री. संजय सावकारे
छत्रपती संभाजीनगर मा.श्री. संजय शिरसाट 
धाराशिव मा.श्री. प्रतापराव सरनाईक
बुलढाणा मा.श्री. मकरंद जाधव पाटील
सिंधुदुर्ग मा.श्री. नितेश राणे
अकोला मा.श्री. आकाश फुंडकर
गोंदिया मा.श्री. बाबासाहेब पाटील
कोल्हापूर

मा.श्री. प्रकाश आबिटकर 

श्रीमती माधुरीताई मिसाळ

गडचिरोली  मा.श्री.आशिष जयस्वाल
वर्धा मा.श्री. पंकज भोयर
परभणी श्रीमती. मेघनाताई बोर्डीकर
   

४. राष्ट्रध्वजारोहण करणारे मा. मंत्री मा. राज्यमंत्री महोदय काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित राहू न शकल्यास विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्तांनी आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रध्वजारोहण करावे. इतर विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी अनुक्रमे संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील. ध्वजवंदनाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडेल याची दक्षता घ्यावी. तसेच, संबंधित प्रांत अधिकारी व तहसिलदार हे अनुक्रमे जिल्हा उपविभागीय व तालुका मुख्यालयी ध्वजारोहण समारंभाच्या ठिकाणी शासकीय कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान स्विकारतील. महाराष्ट्र राज्यामध्ये वरील दिवशी सर्व शासकीय व सार्वजनिक इमारतींवर, किल्ल्यांवर, तसेच जिल्ह्यांमध्ये ऐतिहासिक महत्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत.

५. राष्ट्रध्वजाला वंदन करताना “राष्ट्रगीत” म्हणण्यात यावे/वाजविण्यात यावे व त्यानंतर लगेचच सावधान स्थितीत येऊन “राज्यगीत” वाजविण्यात यावे. ध्वजारोहण समारंभ अध्यक्षस्थान स्विकारणाऱ्या मान्यवरांनी / अधिकाऱ्यांनी अशा प्रसंगी भाषण करावे किंवा नाही हे स्वतः ठरवावे. सलामीच्या वेळी सज्ज असलेला बैन्ड सलामीपूर्वी व सलामीनंतर वाजविण्यास हरकत नसावी.

६. राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक क्रमांक एफएलजी-१०९१/३०, दिनांक २ मार्च, १९९१ तसेच क्रमांक एफएलजी-१०९१/(२)/३०, दिनांक ५ डिसेंबर, १९९१ तसेच क्रमांक एफएलजी-१०९८/ (ध्वजसंहिता)/३०, दिनांक ११ मार्च, १९९८ अन्वये दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. ध्वजारोहणाची रंगीत तालीम घेतली जाईल याची दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना द्याव्यात. राष्ट्रध्वज सुस्थितीत असल्याबाबत व सूर्यास्तास उतरवला जाईल याचीही दक्षता घेण्यात यावी.

७. प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित रहातील याची दक्षता घ्यावी.

८. उत्सव अथवा औपचारिक प्रसंगी परिधान करावयाचा राष्ट्रीय पोषाख प्रजासत्ताक दिन समारंभ प्रसंगी उपस्थित रहाणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी व व्यक्तींनी परिधान करावा असा सल्ला त्यांना मंत्रालयीन विभाग, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी व सर्व संबंधित विभाग / कार्यालय प्रमुख यांनी द्यावा.

९. स्थानिक लोक प्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नींना व आई-वडील यांना समारंभास निमंत्रित करावे. समारंभानंतर संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी सदर समारंभास निमंत्रित केलेल्या मान्यवरांची यादी शासनास तात्काळ सादर करावी.

१०. अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा, यासाठी वेबसाईटद्वारे थेट प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न करावा.

११. दिवसभरातून विविध कार्यक्रम जसे वृक्षारोपण, आंतर शालेय/आंतर महाविद्यालय स्तरावर वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजूषा/देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धांचे आयोजन करावे, प्रभात फेऱ्या काढण्यात याव्यात. सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध खेळांचे आयोजन करण्यात यावे. महत्वाच्या योजनेचा शुभारंभ करावा, शासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करावी, एनएसएस व एनवायकेएस द्वारे देशभक्तीपर मोहिम राबविण्यात यावी, तसेच सोशल मिडीया व Digital माध्यमाद्वारे देशभक्तीपर किंवा राष्ट्रीय एकात्मते संबंधातील गाण्यांचा प्रचार करावा/संदेश द्यावा, याप्रमाणे प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी.

१२. काही ठराविक जिल्ह्यामध्ये निवडणूक आचारसंहिता अंमलात असल्यास सर्व संबंधितांना यासंदर्भात खालीलप्रमाणे सूचना देण्यात याव्यातः-

अ) ध्वजारोहणाच्या नेहमीच्या स्थळामध्ये बदल करण्यात येऊ नये.

ब) कार्यक्रमाचा राजकीय व्यासपीठासारखा वापर करु नये.

क) मा. मंत्री / मा. राज्यमंत्री हे भाषण करणार असल्यास त्यांच्या भाषणाचा आशय ऐतिहासिक मान्यवरांचे कार्य आणि कर्तृत्व, बलिदान केलेल्या हुतात्म्यांचा तसेच देशाचा गौरव यापुरतेच मर्यादित असावे.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२५०११८२१००५६६३०७ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Join Now