२६ जानेवरी – प्रजासत्ताक दिन साठी तयार भाषणे republic day 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

२६ जानेवरी – प्रजासत्ताक दिन साठी तयार भाषणे republic day 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणातील काही भाग (२६ जानेवारी १९५०, संसद भवन)

“आज २६ जानेवारी १९५० रोजी आपण सर्व एका विरोधाभासाच्या आयुष्यात प्रवेश करणार आहोत. राजकारणात आपण समानता अनुभउ परंतु आर्थिक आणि सामाजिक बांधणीमध्ये आपण प्रत्येक व्यक्तीची किंमत मान्य करणार आहोत कि नाही ?”

“आणखी किती काल आपण हे असे विषमतेचे आयुष्य जगायचे? किती दिवस आपण सामाजिक आणि आर्थिक विषमता सुरु ठेवणार आहोत? हे असेच सुरु राहिले तर राजकीय स्वातंत्र्य धोक्यात येईल. असमानतेचे बळी ठरलेले लोक मेहनतीने बनवलेली संविधानिक आणि लोकशाही प्रणीत व्यवस्था उखडून टाकतील.”

“मला ठामपणे वाटते कि हि घटना अतिशय उत्तम ठरते जर ती तितकीच लवचिक असेल आणि शांततेत तसेच युद्धप्रसंगात देशाला एकसंघ ठेवेल, खरंच मला असे वाटते. परंतु जर काही अनुचित किंवा चुकीचे घडले तर घटना चुकीची आहे असे नसून घटना वापरणारे दुष्ट आणि खलकारक असतील.”

“खरया अर्थाने जगामध्ये भारत हा कुठला देश नाहीच आहे, अजून हा खऱ्या अर्थाने देश घडायचं आहे असे मी मानतो. आपण

एक राष्ट्र आहोत असे मानाने म्हणजे निव्वळ भ्रम आहे. १००० प्रकारच्या जातींमध्ये विभागलेला समाज एक राष्ट्र, एक देश

कसा काय होऊ शकतो? लवकरच आपल्याला कळून येईल कि जगाच्या सामाजिक आणि मानसिक तत्वप्रणाली वर आपण

देश या संज्ञेत बसत नाही.”

“स्वातंत्र्य हि बाब आनंद होणारी आहे यात वाद नाही परंतु हे स्वातंत्र्य आपल्यावर भल्या मोठ्या जबाबदाऱ्या सुद्धा टाकते. या

स्वातंत्र्यमुळे आता आपण काहीही चूक झाले कि त्याचे खापर ब्रिटीश सरकार वर फोडू शकत नाही, या नंतर काहीही चुकीचे

घडेल त्यासाठी सर्वस्व आपणच जबाबदार असणार आहोत आणखी कुणी नाही. वेळ फार झपाट्याने बदलत आहे.”

“जेव्हा आम्ही राजकीय लोकशाही स्थापन करीत आहोत तेव्हा हे सुद्धा अपेक्षित आहे कि, आम्ही आपला आदर्श आर्थिक

लोकशाही हाच ठरविला पाहिजे. आम्हाला अपेक्षित नाही कि आम्ही अशी यंत्रणा निर्माण करावी कि ज्यामुळे लोकांनी फक्त

यावे आणि सत्ता प्राप्त करावी. जे लोक सरकार बनविणार आहेत त्यांच्यापुढे भारतीय संविधान एक आदर्श ठेवू इच्छितो. हा

आदर्श आर्थिक लोकशाही हाच आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान चा आम्हास गर्व आहे, भारतीय गणराज्यदिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा !!

जय भारत !!!

Leave a Comment