राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना कुटुंब निवृत्ती वतन सेवा उपदान सर्व लाभ देण्याबाबत rashtriy nivrutti vetan yojna
कै.श्री. अतुल शिवाजी शेटे, मयत उपशिक्षक, एन. पी. एस / डी. सी. पी. एस हे पंचायत समिती माळशिरस येथे कार्यरत असताना दि.०९/१०/२०२३ रोजी मृत्यु पावलेले आहेत.
कै.श्री. अतुल शिवाजी शेटे, मयत उपशिक्षक पंचायत समिती माळशिरस यांना खालील प्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतन विषयक आर्थिक लाभ मंजूर करण्यात येत आहे.
१. कुटुंब निवृत्ती वेतनः- (अंतिम वेतन र. रु. ४२,३००)
श्री. अतुल शिवाजी शेटे, मयत उपशिक्षक हे सेवेत असताना मृत्यु झाल्यामुळे त्यांच्या पश्चात कुटुंब निवृत्ती वेतन हे श्रीमती सोनाली अतुल शेटे (वारस पत्नी) यांना द. म. र. रु. २१,१५०/- (अक्षरी रु. एकवीस हजार एकशे पन्नास फक्त) कर्मचाऱ्याच्या मृत्युनंतरच्या दिनांकापासून १० वर्षे (दि.१०/१०/२०२३ ते दि.०९/१०/२०३३) पर्यंत देय राहील. व त्यानंतर द.म.र.रु. १२,६९०/- (अक्षरी रु. बारा हजार सहाशे नव्वद फक्त) त्यांच्या हयातीपर्यंत देय राहील.
श्रीमती सोनाली अतुल शेटे, ह्या शासकिय सेवेत असल्यास त्यांना कुटुंब निवृत्ती वेतनावर महागाई अनुज्ञेय राहणार
नाही.
सेवा उपदानः-
मृत्यु नि- मृत्यु नि- सेवा उपदान र. रु. ८,४६,०००/- (अक्षरी र.रु. आठ लाख सेहचाळीस हजार फक्त) मंजूर करण्यात येत
आहे.
:- निरंक
वसूली
पतसंस्था वसूली :- निरंक
टीप:- अ) यापूर्वी महाराष्ट्र शासन निर्णय वित्त विभाग क्रं. रानिप्र-२०२३/प्र.क्रं.५७/सेवा-४ दि. २४ ऑगस्ट २०२३ मधील तरतूदीनुसार लाभ व सानुग्रह अनुदान र. रु. १०,००,०००/- संबंधित वारसास अदा केले असल्यास नियमाप्रमाणे समायोजित करण्यात यावा.
ब) कुटुंब निवृत्ती वेतन व इतर निवृत्ती वेतन विषयक आर्थिक प्रदानाची नोंदी निवृत्ती प्रदान आदेशात घेऊन त्या साक्षांकित कराव्यात.
क) शेवटच्या महिन्याचे वेतन मॅट्रिक्स मधील घेत असलेल्या वेतनावरून कुटुंब निवृत्ती वेतन व इतर लाभ निर्धारित करण्यात आलेले आहे.