राष्ट्र पुरुष थोर व्यक्तींचे जयंती दिन व अन्य राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत rashtrapurush jayanti national day celebration 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्र पुरुष थोर व्यक्तींचे जयंती दिन व अन्य राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत rashtrapurush jayanti national day celebration 

वाचा :- शासन परिपत्रक क्र. जपुती २२२१/प्र.क्र.११२/कार्या.२९, दि.३१ डिसेंबर, २०२१

शासन परिपत्रक :-

सन २०२२ मध्ये राष्ट्र पुरुष थोर नेत्यांची जयंती व राष्ट्रीय दिनाचे कार्यक्रम मंत्रालयात व सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात साजरे करण्याबाबतचे परिपत्रक दि.३१ डिसेंबर, २०२१ रोजी प्रसिध्द करण्यात आले आहे.

२. सदर परिपत्रकामध्ये दर्शविलेले जे कार्यक्रम सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी, शनिवारी व रविवारी येत असले तरी, ते कार्यक्रम त्या-त्या दिवशी साजरे करण्यात यावेत.

३. राष्ट्र पुरुष /थोर व्यक्ती यांच्या जयंती दिनी मंत्रालयात माहिती व जनसंपर्क विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व डिस्प्ले बोर्डवर संबंधीत राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांची माहिती संपूर्ण दिवस प्रदर्शित करण्यात यावी.

४. राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांचे जयंती दिनी सर्व शाळा / महाविद्यालये येथे जयंती साजरी करतांना संबंधित राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांनी देशासाठी केलेल्या अनमोल कार्याचे सर्व शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, या अनुषंगाने व्याख्याने, निबंध स्पर्धा अशाप्रकारचे विविध कार्यक्रम शाळा तसेच महाविद्यालयात आयोजित करण्यात यावेत. जेणेकरुन भावी पिढीला राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांचे देशासाठी केलेल्या महान कार्याची माहिती होईल. तसेच जयंती दिन सुट्टीच्या दिवशी येत असल्यास शाळा / महाविद्यालये यांनी राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांच्या यावत व्याख्याने, निबंध स्पर्धा अशाप्रकारचे विविध कार्यक्रम सुट्टीच्या आदल्या दिवशी आयोजित करणे उचित राहील.

५. विभागीय आयुक्त/जिल्हाधिकारी / मुख्य कार्यकारी अधिकारी आयुक्त, महानगरपालिका यांनी त्यांच्या विभागातील/जिल्हयातील / महानगरपालिकेतील सर्व शाळा / महाविद्यालयात सदर कार्यक्रम आयोजित करण्याबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित करुन त्यांच्या अंमलबजावणीबाबत योग्य ती कार्यवाही करावी.

६. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२२०९०६१५५३१३०२०७ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने